शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी, पेपरफुटी झाल्यास शाळेचे अनुदान बंद करणार, राजेश क्षीरसागर यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:21 IST

परीक्षेचे काम टाळल्यास कारवाई, थकबाकीसाठी प्रवेशपत्रे रोखणार

सांगली : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी किंवा पेपरफुटी झाल्यास शाळेचे अनुदान बंद करण्याचा इशारा परीक्षा बोर्डाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला. परीक्षेचे काम टाळल्यास शिक्षकांवर कारवाई केली जाईल, तसेच शाळेकडे बोर्डाची थकबाकी असल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रे रोखण्याचा इशाराही दिला.येथील विलिंग्डन महाविद्यालयात जिल्ह्यातील प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. बैठकीला विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, विभागीय सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी. एम. किल्लेदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, योजना शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, बोर्डाचे अधीक्षक सुधीर हावळ, एस. वाय. दुधगावकर, एम. जी. दिवेकर, एच. के. शिंदे, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी चांगली तयारी करून घ्यावी. शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करून घ्यावा. केंद्रावरील गैरप्रकार बंद केले नाहीत, तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांचे उद्बोधन वर्ग घेऊन कॉपीमुक्तीची शपथ द्या. राज्य परीक्षा मंडळाने बोर्डाचे नवे ॲप विकसित केले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा. यावेळी सुभाष चौगुले, चोथे, लोंढे यांनीही मार्गदर्शन केले.

सात वर्षांनी बैठकतब्बल सात वर्षांनंतर पूर्णवेळ विभागीय अध्यक्षांच्या उपस्थितीत थेट जिल्हास्तरावर बैठक झाली. मंडळ सातत्याने ऑनलाइन बैठका घेऊन परीक्षेच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या मदतीने कडक नियंत्रणात परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. या महिन्यात शाळा स्तरावर आणि परीक्षेच्या पहिल्या दिवशी केंद्रावर कॉपीमुक्तीची विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे.

..तर शाळांवर होणार कडक कारवायाक्षीरसागर म्हणाले, सामूहिक कॉपी व पेपरफुटीच्या घटना गांभीर्याने घेतल्या जातील. केंद्रशाळेचे अनुदान बंद करणे, शाळा स्वयम् अर्थसहायित करण्यासाठी शिफारस करणे, शाळेचे सांकेतांक गोठवणे यासारखी गंभीर कारवाई केली जाईल. बैठकीला गैरहजर असलेल्या शाळा प्रमुखांना नोटिसा बजावण्याचे आदेश त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.

टॅग्स :Sangliसांगलीexamपरीक्षाSchoolशाळा