जत : चारा कटींगचे मशीन सुरू करताना वीजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ओंकार शिवाजी शेळके (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. जत तालुक्यातील पाच्छापुर येथे काल गुरुवारी (दि.२८) ही दुर्दैवी घटना घडली. ओंकार इयत्ता नववीमध्ये पाच्छापुर हायस्कूल येथे शिकत होता. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर वाघे वस्ती येथे स्वतःच्या शेतात जनावरांना चारा कट करण्यासाठी मशीन सुरू करण्यासाठी गेले असता त्याला विजेचा धक्का लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जत ग्रामीण रुग्णालय रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.
Sangli: चारा कटींगचे मशीन सुरू करताना वीजेचा धक्का लागला, शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 17:49 IST