Savita Chavan felicitated | सविता चव्हाण यांचा सत्कार

सविता चव्हाण यांचा सत्कार

फोटो-०५तासगाव१

फोटो : तासगाव येथील गुंतवणूक व आर्थिक सल्लागार सविता चव्हाण यांचा खासदार संजयकाका पाटील यांनी सत्कार केला. यावेळी अविनाश चव्हाण, नितीन पाटील, राजेंद्र मेढेकर उपस्थित होते.

मिरज : तासगाव येथील गुंतवणूक व आर्थिक सल्लागार सविता चव्हाण यांना कोर्ट ऑफ टेबल हा आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाल्याबद्दल सविता चव्हाण यांचा खासदार संजयकाका पाटील यांनी सत्कार केला.

सविता चव्हाण यांचे आर्थिक नियोजन क्षेत्रातील काम प्रशंसनीय असल्याने त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्याचे व सविता चव्हाण यांना कोर्ट ऑफ द टेबल हा आंतरराष्ट्रीय बहुमान ही सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन खासदार संजयकाका पाटील यांनी केले.

यावेळी नितीन पाटील, एचडीएफसी लाईफचे नितीन पाटील, केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर उपस्थित होते. सविता चव्हाण यांनी पहिल्या वर्षी मिलियन डॉलर राऊंड टेबल व दुसऱ्या वर्षी कोर्ट ऑफ दि टेबल हा बहुमान मिळवला आहे. गुंतवणूकदारांच्या विश्वासाबद्दल सविता चव्हाण यांनी आभार मानले. सविता चव्हाण यांना खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, एचडीएफसी लाईफचे प्रणव वाघमारे, अभिनंदन पाटील, नितीन पाटील, केंद्रीय जीएसटी निरीक्षक राजेंद्र मेढेकर, राम पाटील , प्रशांत साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Savita Chavan felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.