कबड्डी स्पर्धेत कोकरुडची सत्यशिव अकॅडमी प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:24+5:302020-12-11T04:53:24+5:30

कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) येथे जयभवानी कबड्डी संघ (रेठरे-वारणा, ता. शाहूवाडी) यांनी आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत सत्यशिव अकॅडमी ...

Satyashiv Academy of Kokrud won the Kabaddi competition | कबड्डी स्पर्धेत कोकरुडची सत्यशिव अकॅडमी प्रथम

कबड्डी स्पर्धेत कोकरुडची सत्यशिव अकॅडमी प्रथम

कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) येथे जयभवानी कबड्डी संघ (रेठरे-वारणा, ता. शाहूवाडी) यांनी आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत सत्यशिव अकॅडमी (कोकरुड) संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. शिवशक्ती स्पोर्टस्, सदाशिवगड यांनी द्वितीय क्रमांक, शिराळा स्पोर्टस्, शिराळाने तृतीय क्रमांक, तर चतुर्थ क्रमांक माळाई स्पोर्टस्, मालगाव यांनी मिळविला.

पंच म्हणून संजय पाटील, उमेश पाटील, गणेश गुरव, विजय पाटील आणि राजेंद्र भोसले यांनी काम पाहिले. सर्वोत्तम खेळाडू वैभव पाटील, सर्वोत्तम चढाईपटू सूरज पाटील, सर्वोत्तम रक्षक अक्षय नांगरे यांची निवड करण्यात आली. विजेत्या संघास अनुक्रमे ७००१, ५००१, ३००१, १००१ अशी बक्षिसे देण्यात आली. अमोल पवार यांनी समालोचन केले.

विजेत्या संघास भाजपचे नेते सत्यजित देशमुख, जि. प. सदस्य संपतराव देशमुख, मंत्रालय कक्ष अधिकारी विनायकराव टोमके, विकासराव नांगरे, कोकरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वाघ, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम, उपसरपंच पोपट पाटील, डी. बी. परीट, श्रीरंग नांगरे, नंदकुमार पाटील, गजानन पाटील, प्रा. ए. सी. पाटील, मोहन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो-१०कोकरुड०२

फोटो ओळी : कोकरुड (ता. शिराळा) येथे कबड्डी स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघास सत्यजित देशमुख यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संपतराव देशमुख, विकासराव नांगरे, विनायकराव टोमके उपस्थित होते.

Web Title: Satyashiv Academy of Kokrud won the Kabaddi competition