जिल्ह्यात जीएसटी संकलन समाधानकारक : के. राजकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:11+5:302021-07-07T04:32:11+5:30
सांगलीतील केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयात जीएसटीचा चौथा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख ...

जिल्ह्यात जीएसटी संकलन समाधानकारक : के. राजकुमार
सांगलीतील केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयात जीएसटीचा चौथा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे नवनियुक्त सदस्य प्रा. संजय ठिगळे उपस्थित होते. के. राजकुमार म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे करचुकवेगिरीची माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यावर वेळोवेळी कार्यवाही करून वसुलीचे काम सुरू आहे.
प्रा. संजय ठिगळे म्हणाले, गेल्या चार वर्षांत जीएसटी कर अधिक सोपा झाल्याचे दिसून येत आहे. पारदर्शक कर प्रणालीचे फायदे लोकांसमोर असल्याने अर्थव्यवस्थेला बळकटी येत आहे.
या वेळी सर्वाधिक कर भरल्याबद्दल राजारामबापू साखर कारखान्याचे मुख्य लेखापाल अमोल पाटील, समृद्धी इंडस्ट्रीजचे शरद पाटील, श्रीनिवास ट्रेडिंग कंपनीचे अशोक बाफना, सुयेश आयर्न व कास्टिंग, मिरजचे संजय मगदूम, मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे चिफ केमिस्ट के.ए. लोखंडे या करदात्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कोल्हापूर केंद्रीय जीएसटी आयुक्तांचे सन्मानपत्र मिळाल्याबद्दल हवालदार सिकंदर गोदड यांचा गौरव करण्यात आला.
निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी अधीक्षक आर.एच. कुलकर्णी, निरीक्षक प्रमोद कुशवाह, पंकज बंसल, हवालदार यासीन मुलाणी यांनी मार्गदर्शन केले. अधीक्षक निवेन तेलंग यांनी प्रास्ताविक केले. अधीक्षक मकरंद कुलकर्णी यांनी आभार मानले. या वेळी अधीक्षक विजय खरात, निरीक्षक महेंद्र सिंघ, संतोष खटावकर, कैलास कोळी, नितीन कारांडे, किरण खोत, प्रकाश साबळे उपस्थित होते.
फोटो : ०५ मिरज ४
ओळ : सांगलीत जीएसटी कार्यालयातर्फे करदात्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी साहाय्यक आयुक्त के. राजकुमार, प्रा. संजय ठिगळे, आर.एच. कुलकर्णी, राजेंद्र मेढेकर, अमोल पाटील, अशोक बाफना आदी उपस्थित हाेते.