आष्ट्यातील क्रिकेट स्पर्धेत सातारा असोसिएशनला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:24+5:302021-01-20T04:26:24+5:30

आष्टा : आष्टा डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर्स असोसिएशनसाठी आयाेजित क्रिकेट स्पर्धेत सातारा डॉक्टर्स असोसिएशनचे विजेतेपद पटकावले. ...

Satara Association wins Ashta Cricket Tournament | आष्ट्यातील क्रिकेट स्पर्धेत सातारा असोसिएशनला विजेतेपद

आष्ट्यातील क्रिकेट स्पर्धेत सातारा असोसिएशनला विजेतेपद

आष्टा : आष्टा डॉक्टर्स असोसिएशनच्यावतीने सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर्स असोसिएशनसाठी आयाेजित क्रिकेट स्पर्धेत सातारा डॉक्टर्स असोसिएशनचे विजेतेपद पटकावले. तर कोल्हापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या स्कॉर्पिअन ए संघाने उपविजेतेपद पटकाविले.

आष्टा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोळी व ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. मनोहर कबाडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. योगेश पाटील (सर्वोत्कृष्ट खेळाडू), डॉ. महेश नाळे (सर्वोत्कृष्ट गोलंदाज), डॉ. प्रिन्स रजपूत (सर्वोत्कृष्ट फलंदाज) यांना गौरविण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. विजय गंगधर, सचिव डॉ. विक्रम अनुसे, डॉ. आर. एस. चौगुले, डॉ. अनिल निर्मळे, डॉ. सुभाष पाटील, डॉ. धनपाल वाठारे, डॉ. धवल मालगावे, डॉ. सुनील मस्के-पाटील, डॉ. रूपेश पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. सूरज पाटील, डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. संजय सिद्ध, डॉ. विनायक माने, डॉ. ज्योतीराम मस्के-पाटील, डॉ. महेश पाटील, डॉ. रियाज पटेल, डॉ. राहुल आवटी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन आष्टा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोळी, सचिव डॉ. अमोल पाटील यांनी केले.

फोटो : १९आष्टा १

ओळ : आष्टा डॉक्टर्स असोसिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धेत विजेत्या सातारा संघाला अध्यक्ष डॉ. प्रवीण कोळी, डॉ. मनोहर कबाडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Satara Association wins Ashta Cricket Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.