शिराळ्यात १५ रोजी सरपंच, उपसरपंच आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:42+5:302020-12-11T04:53:42+5:30
शिराळा : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच आरक्षण सोडती मंगळवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ...

शिराळ्यात १५ रोजी सरपंच, उपसरपंच आरक्षण सोडत
शिराळा : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच आरक्षण सोडती मंगळवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालयात काढण्यात येणार आहेत. ज्या मतदारांना हे कामकाज पाहायचे असेल त्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.
९१ ग्रामपंचायतींमधून अनुसूचित जाती व अनु. जमातींमधून सरपंचपदाचे आरक्षण त्या जाती, जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात उतरत्या क्रमाने राखून ठेवले जाणार आहे. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्ग तसेच प्रत्येक प्रवर्गातील ५० टक्के स्त्री आरक्षण सोडत होणार आहे. ही सोडत तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी ठीक ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच सरपंच आरक्षणाचा कालावधी दि. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ असा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.