संजयनगरला जबरी चोरी करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:24 IST2021-03-20T04:24:57+5:302021-03-20T04:24:57+5:30

सांगली : शहरातील संजयनगर येथे दमदाटी करून घरासमोर लावलेली दुचाकी घेऊन जाणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. तुकाराम ...

Sanjaynagar burglar arrested | संजयनगरला जबरी चोरी करणारा अटकेत

संजयनगरला जबरी चोरी करणारा अटकेत

सांगली : शहरातील संजयनगर येथे दमदाटी करून घरासमोर लावलेली दुचाकी घेऊन जाणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली. तुकाराम सुभाष मोटे (वय २५, रा. रामजानकी मंदिराजवळ, संजयनगर,सांगली) असे संशयिताचे नाव आहे. संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १६ मार्च रोजी संजयनगर येथे सुहेल हुसेन सुभेदार हे घरासमोर लावलेली दुचाकीवर बसले होते. यावेळी संशयित मोटे तिथे आला व त्याने दमदाटी करत मारहाण केली. सुभेदार यांच्या कुटुंबीयांनाही त्याने शिवीगाळ करत साहित्याची तोडफोड केली व दुचाकी घेऊन निघून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत दुचाकी जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक विष्णू माळी याचा तपास करत आहेत. सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Sanjaynagar burglar arrested