शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या शुभेच्छांसाठी सांगलीत विद्यमान अन् भावी खासदार एकत्र; संजय पाटील यांच्या टिप्पणीने हास्याची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 18:41 IST

एक मातीत खेळणारा, तर दुसरा..

सांगली : एरवी निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांवर आरोपांची राळ उडवत फिरणारे उमेदवार मतपेटीसाठी मात्र खांद्याला खांदा लावून एकत्र आल्याचे मतदारांनी अनुभवले. गुरुवारी सकाळी सांगलीत व मिरजेत ईदगाह मैदानावर विद्यमान आणि भावी खासदार एकत्र आले. त्यांच्यात शेरेबाजीही रंगली.एरवीदेखील मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ईदगाह मैदानांवर जातातच. पण यावेळची रमजान ईद ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आल्याने उमेदवारांसाठी तिचे महत्त्व जास्त होते. मुस्लीम धर्मीयांच्या गठ्ठा मतदानाचे साऱ्याच उमेदवारांना आकर्षण असते. ते खेचून घेण्यासाठी ईदच्या शुभेच्छा वापरण्याचा प्रयत्न केला जातो. आज सकाळी भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसकडून इच्छुक असणारे विशाल पाटील सांगलीत ईदगाह मैदानावर एकत्र आले. स्वाभिमानी संघटनेचे इच्छुक महेश खराडे हेदेखील उपस्थित होते. संजय पाटील आणि चंद्रहार पाटील हे खेटून उभे होते, मात्र विशाल पाटील काही अंतरावर थांबून होते. त्यांच्यामध्ये पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील होत्या. नमाज अदा होईपर्यंत संजय पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात गप्पाही रंगल्या. विशाल पाटील यांचा मात्र विशेष संवाद झाला नाही. यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील, जनसुराज्यचे समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्माकर जगदाळे, संजय बजाज आदी उपस्थित होते.एक मातीत खेळणारा, तर दुसरा..खासदार संजय पाटील यांनी यावेळी केलेल्या टिप्पणीने वातावरण खेळीमेळीचे झाले. विशाल आणि चंद्रहार यांच्याबद्दल ते म्हणाले, एक पैलवान डोक्याने खेळणारा, तर दुसरा मातीत खेळणारा आहे. यावर चंद्रहार यांनी त्यांना हसून दाद दिली. उपस्थितांमध्येही हास्याची लाट उसळली.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjaykaka patilसंजयकाका पाटीलchandrahar patilचंद्रहार पाटीलvishal patilविशाल पाटील