शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

Everest Trekking : सांगलीच्या सुपुत्राने केले सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 16:49 IST

Everest Trekking Sangli : सांगलीचे सुपुत्र व नवी मुंबईत नियुक्तीस असणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालण्यात यश मिळवले. रविवारी सकाळी अंतिम चढाई पूर्ण करत ८ हजार ८४८ मीटर उंचीवर तिरंगा फडकावला.

ठळक मुद्देसांगलीच्या सुपुत्राने केले सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर पादाक्रांतसंभाजी गुरव तिरंगा फडकावणारे पहिलेच मराठी पोलीस अधिकारी

सांगली : सांगलीचे सुपुत्र व नवी मुंबईत नियुक्तीस असणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालण्यात यश मिळवले. रविवारी सकाळी अंतिम चढाई पूर्ण करत ८ हजार ८४८ मीटर उंचीवर तिरंगा फडकावला.पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट पायाखाली घेणारे ते पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले आहेत. शिवाय सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पहिलेच एव्हरेस्टवीर असा पराक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे.पडवळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील संभाजी गुरव सुमारे पंधरा वर्षांपासून पोलीस दलात आहेत. एव्हरेस्ट चढाईसाठी दोन वर्षांपासून त्यांची तयारी सुरु होती. गेल्या ६ एप्रिलरोजी मुंबईतून रवाना झाले. नेपाळमधील पायोनियर ॲडव्हेन्चर्स या गिर्यारोहक कंपनीमार्फत सहाजणांच्या पथकातून चढाई सुरु केली. काही दिवसांपूर्वी किलीमांजरी शिखऱ सर केल्याने आत्मविश्वास वाढला होता. १८ मेपासून नेपाळच्या बाजूने प्रत्यक्ष एव्हरेस्टची चढाई सुरु केली.२१ मे रोजी अंतिम चढाईसाठी चांगले वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती. बेस कॅम्पला कोरड्या वातावरणात जास्त दिवस राहिल्याने पथक रिकव्हरीसाठी लुकला या ठिकाणी ग्रीनरीमध्ये काही दिवस थांबले. यादरम्यान, त्यांचा शेर्पा आजारी पडल्यानेही अडचण आली. एव्हरेस्ट शिखराच्या खूप जवळ गेल्याची भावना होती, पण कॅम्प क्रमांक तीनपासून पुढे शारिरीक आणि मानसिक कसोटी होती. तेथून पुढे धोकादायक डेथ झोनही होता. बर्फवृष्टी, व्हाईटआऊट (बर्फाचे धुके) याचाही त्रास झाल्याचे गुरव यांनी सांगितले. हिमभेगाही दिसत नव्हत्या, पण अनुभवी शेर्पामुळे चढाई शक्य झाली.पहिलेच मराठी पोलीस अधिकारीसांगलीचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुहैल शर्मा व अ‍ौरंगाबाद येथील पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनी यापूर्वी एव्हरेस्ट सर केला आहे, पण संभाजी शर्मा पंजाबी अधिकारी तर शेख पोलीस कर्मचारी होते. गुरव हे पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले आहेत.चौकटगडचिरोलीमध्येही पराक्रमगुरव यांनी गडचिरोलीमध्ये असताना केलेल्या धा़डसी कामगिरीबद्दल २०१४ मध्ये राष्ट्रपती पदक, २०१५ मध्ये विशेष सेवा पदक, २०१८ मध्ये आंतरिक सेवा पदक व महासंचालकांचे विशेष पदक मिळवले आहे. धाडसी पोलीस अधिकारी अशी त्यांची पोलीस दलातील प्रतिमा आहे.अशी केली चढाई

  • १८ मे - बेस कॅम्प ते कॅम्प २
  • १९ मे - कॅम्प २ ते कॅम्प ३
  • २० मे - कॅम्प ३ ते कॅम्प ४
  • २१ मे - कॅम्प ४ ते एव्हरेस्ट समिट
  • २३ मे सकाळी - शिखरावर तिरंगा

पडवळवाडीमध्ये आनंदोत्सवसंभाजी गुरव यांचे मूळ गाव असलेल्या पडवळवाडीमध्ये सकाळीच गुरव यांच्या भीमपराक्रमाची माहिती समजली. त्यानंतर आनंदोत्सव साजरा झाला. वडील नारायण यांनी मुलाच्या कर्तृत्वाचा खुपच आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. संंभाजी यांच्या पत्नी सुजाता म्हणाल्या, गेली दोन वर्षे एव्हरेस्ट चढाईसाठी प्रयत्न सुरु होते, या मेहनतीचे चीज झाले. 

टॅग्स :Everestएव्हरेस्टSangliसांगलीTrekkingट्रेकिंगPoliceपोलिस