शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या स्किन बँकेमुळे दोन बालकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:19 IST

संपूर्ण राज्यात त्वचादान करण्याच्या बाबतीत सर्वाधिक प्रतिसाद सांगलीत मिळत असतानाच रोटरीच्या स्किन बँकेमुळे दोन बालकांना जीवदान मिळाल्याची घटना सांगलीत घडली. ५२ व ३५ टक्के इतके शरीर भाजले असतानाही या दोन्ही बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून येथील डॉक्टरांनी सांगलीच्या स्किन बँकेचे महत्त्व अधोरेखीत केले.

ठळक मुद्देसांगलीच्या स्किन बँकेमुळे दोन बालकांना जीवदान, पाचजणांचे त्वचादान उपक्रमास राज्यात सर्वाधिक प्रतिसाद सांगलीमध्ये

सांगली : संपूर्ण राज्यात त्वचादान करण्याच्या बाबतीत सर्वाधिक प्रतिसाद सांगलीत मिळत असतानाच रोटरीच्या स्किन बँकेमुळे दोन बालकांना जीवदान मिळाल्याची घटना सांगलीत घडली. ५२ व ३५ टक्के इतके शरीर भाजले असतानाही या दोन्ही बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून येथील डॉक्टरांनी सांगलीच्या स्किन बँकेचे महत्त्व अधोरेखीत केले.सहा महिन्यांपूर्वी देशातील आठवी आणि महाराष्ट्रातील चौथी त्वचापेढी सांगलीत रोटरीच्या माध्यमातून सुरू झाली. रोटरीच्या पदाधिकारी, सदस्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अवघ्या सहा महिन्यात या बँकेस सहाजणांनी त्वचादान केले. मुंबईमध्ये वर्षाकाठी केवळ एकच त्वचादान झाले असताना सांगलीत अवघ्या सहा महिन्यात पाचजणांचा प्रतिसाद मिळाल्याने दिलासा मिळाला.

त्वचापेढी सुरू केल्यानंतर पहिलीच शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. याविषयी बँकेचे प्रमुख डॉ. अविनाश पाटील म्हणाले की, विटा येथील दीड वर्षीय अर्णव निलेश सूर्यवंशी हा ५२ टक्के भाजल्याने, तर कर्नाटकातील यलट्टी येथील एक वर्षाचा नीरज बसवराज मगदुम हा ३५ टक्के भाजल्याने रोटरीच्या स्किन बँक व हॉस्पिटलमध्ये दाखल झाला.एकाचवेळी दोन बालकांना पुरेशा प्रमाणात त्वाचा उपलब्ध असल्याने त्याच्यावर लगेचच उपचारास सुरुवात करण्यात आली. तीन महिन्यांची उपचारपद्धती असताना केवळ एका महिन्यात या दोन्ही बालकांवर उपचार पूर्ण होऊन ते पुन्हा बागडायला लागले. त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचे गेलेले हसून पुन्हा फुलले.कोणताही रुग्ण २५ टक्केपेक्षा अधिक भाजपला तर त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सांगलीत दाखल झालेली ही दोन्ही बालके गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्यांच्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्वचादान करणाºया व्यक्ति व त्यांच्या कुटुंबियांच्या सत्पात्री दानप्रक्रियेमुळे या दोन बालकांना जीवनदान मिळाले तसेच दोन कुटुंबेही मोठ्या संकटातून बाहेर पडली.

दहन करून मृत व्यक्तीच्या त्वचेची राख तर दफन करून त्वचेची माती होत असल्याने दुसऱ्या जीवाला जीवदान देण्यासाठी व्यक्तीची केवळ ३0 टक्के त्वचा दान करावी, असे आवाहन अविनाश पाटील, रोटरीचे अरुण दांडेकर आदींनी केले.यांनी केले त्वचादानसांगलीतील गावभागातील उद्योजक हणमंत गोरे यांचे निधनानंतर, विश्रामबाग जयहिंद कॉलनीतील सावित्री दामोदर शिंदे यांचेही निधनानंतर त्वचादान करण्यात आले होते. या त्वचेचा लाभ जखमी बालकांना झाला. याशिवाय आणखी तीनजणांनी बँकेकडे त्वचादान केल्याचे पाटील म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यSangliसांगली