शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या एलसीबीची कामगिरी, सालपे येथील वृद्ध महिलेच्या खूनाचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 11:46 IST

सालपे (जि. सातारा) येथील वृद्ध महिलेचा खून करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले.

ठळक मुद्देसांगलीच्या एलसीबीची कामगिरी, सालपे येथील वृद्ध महिलेच्या खूनाचा छडा एकास अटक, चार जणांची नावे निष्पन्न

सांगली : सालपे (जि. सातारा) येथील वृद्ध महिलेचा खून करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले.

या प्रकरणी रोहित चिवळ्या पवार ( रा. वाळवा) याला अटक केली असून आणखी चार जणांची नावेही निष्पन्न झाली आहेत. पुढील तपासासाठी रोहित पवार याला सातारा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी इस्लामपूर, वाळवा या परिसरातील चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना दिले होते.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, बिरोबा नरळे, संदीप पाटील, सागर टिंगरे यांचे पथक इस्लामपूर, वाळवा या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत होते. पोलिस नाईक बिरोबा नरळे यांना खबऱ्यामार्फत फलटण तालुक्यात चोरीचे गुन्हे करणारा रोहित पवार हा संशयित वाळवा येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने रोहित पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सालपे येथे खून करून दागिने लुटल्याची कबुली दिली.सालपे येथे २९ आॅक्टोबर रोजी रात्री दोन ते तीनच्या सुमारास शांताबाई जयवंत खरात (वय ७०) ही महिला प्रातविधीसाठी घराचे बाहेर गेली असता तिच्या पाठीत चाकूने वार करून तिचा खून करण्यात आला होता. तसेच त्यांच्य ागळ्यातील मणी मंगळसुत्र चोरून नेले होते.

या खूनाचा तपास सुरू असून संशयितांची नावे निष्पन्न झाले नव्हती. रोहित पवार याच्या मुसक्या आवळताच हा खूनाचा उलघडा झाला. त्याने मुक्या भीमराव पवार (रा. वाळवा), चंदया जल्या पवार (रा. बडेखान, ता. फलटण), बाप्या परश्या शिंदे (रा. खंडाळा), नकट्या तुक्या शिंदे (रा. लिंबोर) याच्या साथीने शांताबाई खरात यांच्या खून केल्याची कबुली दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने लोणंद पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपासासाठी संशयित पवार याला सातारा गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.आर्वे येथील घरफोडी उघडकीसया सर्व संशयितांनी आर्वे (जि. सातारा) येथील एका घरात घरफोडी करून महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरल्याची कबुली दिली आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSangliसांगलीSatara areaसातारा परिसर