दगडफेकप्रकरणी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर सांगलीतल गुन्हा : पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:24 IST2018-11-09T23:23:37+5:302018-11-09T23:24:04+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांच्याविरुद्ध शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगडफेकप्रकरणी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर सांगलीतल गुन्हा : पोलिसांची कारवाई
सांगली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांच्याविरुद्ध शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री दगडफेकीची ही घटना घडली होती.
जिल्ह्यात उसाला दर जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरु करु नयेत, या मागणीसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक झाली होती. निवडणूक कार्यालयाच्या खिडकीची काच फुटून दोन हजाराचे नुकसान झाले होते.
स्वाभिमानी शेतकरी व रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी या दोन्ही संघटनांनी दगडफेकीची जबाबदारी स्वीकारली होती. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध दगडफेकीचा गुन्हा दाखल केला होता. तीन-चार दिवस केलेल्या तपासात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार चिदानंद चौगुले यांनी फिर्याद दिली आहे. यापुढेही मंत्र्यांच्या वाहनावर तसेच शासकीय कार्यालयावर दगडफेकीचा इशारा संघटनेने दिला आहे, असे चौगुले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.