मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर दिसायला मिळत आहे. अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यासह आता सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बिबटे दिसत आहे. दोन दिवसापूर्वी वाळवा तालुक्यातील कुरळप येथे बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता कामेरी या गावातील एका ऊसाच्या शेतीमध्ये बिबट्याची चार पिल्लं आढळले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले
काही दिवसांपासून बिबट्या शहरी भागाकडे वळल्याच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अलीकडेच सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्रामबाग या ठिकाणी बिबट्यांचा वावर आढळून आला होता. वन विभाग आणि पोलीस विभागाकडून याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. अशातच आज वाळवा तालुक्यातील कामेरी या ठिकाणी एका शेतामध्ये चार बिबट्यांचे पिल्ले आढळे आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, या पिल्लांना वन विभागाने ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी त्यांना सोडण्यात आले आहे.
आज सकाळी कामेरी येथील शेतकरी ऊसाच्या शेतामध्ये गेले होते. यावेळी त्यांना शेतामध्ये बिबट्याचे चार पिल्ले आढळले. यावेळी त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाने हे पिल्ले सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहेत. दरम्यान, बिबट्या किंवा बिबट्याची पिल्ले आढळल्यास वन विभागाला त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
Web Summary : Four leopard cubs were discovered in a sugarcane field in Kameri, Sangli, causing widespread fear. Forest officials have secured the cubs and are urging residents to report any leopard sightings immediately.
Web Summary : सांगली के कामेरी में गन्ने के खेत में तेंदुए के चार बच्चे मिलने से दहशत फैल गई। वन विभाग ने शावकों को सुरक्षित कर लिया है और निवासियों से तेंदुए दिखने पर तुरंत रिपोर्ट करने का आग्रह किया है।