सांगली : खिलारवाडीत अनैतिक संबंधास विरोध केल्याने महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:18 IST2018-12-31T12:16:28+5:302018-12-31T12:18:06+5:30

खिलारवाडी (ता. जत) येथे अनैतिक संबंधास विरोध केल्याने सुनीता भैय्याजी लोखंडे (वय ३०) या महिलेचा दीराने चाकूने भोसकून खून केला.

Sangli: The woman's blood, after protesting against immoral relations in Khilarwadi | सांगली : खिलारवाडीत अनैतिक संबंधास विरोध केल्याने महिलेचा खून

सांगली : खिलारवाडीत अनैतिक संबंधास विरोध केल्याने महिलेचा खून

ठळक मुद्देखिलारवाडीत अनैतिक संबंधास विरोध केल्याने महिलेचा खूनदीराचे कृत्य : दोघांना अटक

जत : खिलारवाडी (ता. जत) येथे अनैतिक संबंधास विरोध केल्याने सुनीता भैय्याजी लोखंडे (वय ३०) या महिलेचा दीराने चाकूने भोसकून खून केला.

ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी दीर पांडुरंग कामू लोखंडे व त्याचा मित्र संजय कृष्णा सोलनकर (दोघेही रा. खिलारवाडी) या दोघांविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

खिलारवाडी येथील लोखंडे कुटुंबिय शेतमजुरीचे काम करतात. मृत सुनीता हिचा पती भैय्याजी व पांडुरंग हे दोघे सख्खे भाऊ आहेत. खिलारवाडी गावापासून जवळच त्यांची वस्ती आहे. पांडुरंग हा भैय्याजीची पत्नी सुनीता हिच्याकडे शारिरीक संबंधाची मागणी करीत होता.

सुनीता त्याला विरोध करीत होती. यामुळे पांडुरंग संतापला होता. या रागातून रविवारी रात्री पांडुरंग आपला मित्र संजय कृष्णा सोलनकर याच्यासह घरी आला. यावेळी सुनीता अंगणात बसली होती.

शारिरीक संबंधास विरोध का करतेस, असे म्हणत पांडुरंग व संजय यांनी तिला घरात ओढून नेले. मारहाण करीत तिच्यावर चाकूने हल्ला केला. पोटावर खोलवर वार झाल्याने रक्तस्राव होऊन सुनीता जागीच ठार झाली.

याप्रकरणी मृत सुनीता हिचा पती भैय्याजी लोखंडे याने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित पांडुरंग लोखंडे व संजय सोलनकर यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Sangli: The woman's blood, after protesting against immoral relations in Khilarwadi