शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सांगली : संखमध्ये तरुणीचा गळा आवळून खून, बलात्काराचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 14:31 IST

संख (ता. जत) येथील सविता संताराम सोनवणे (वय १८) हिच्या गूढरित्या बेपत्ता होण्याचे गूढ मंगळवारी सकाळी उकलले. ऊसाच्या शेतात विवस्त्रावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे संखमध्ये तरुणीचा गळा आवळून खून, बलात्काराचा संशयतीन संशयित ताब्यात; ऊसात मृतदेह आढळला

सांगली : संख (ता. जत) येथील सविता संताराम सोनवणे (वय १८) हिच्या गूढरित्या बेपत्ता होण्याचे गूढ मंगळवारी सकाळी उकलले. ऊसाच्या शेतात विवस्त्रावस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खुनापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.जुना करजगी-संख रस्त्यावर संखपासून एक किलोमीटर अंतरावर शेतात सोनवणे कुटूंब राहते. सोमवारी दुपारी मृत सविताचे वडील आठवडा बाजारात बाजार करण्यासाठी गेले होते. तिचा एक मोठा भाऊ कोल्हापूरला परीक्षेसाठी गेला होता. दुसरा मोठा भाऊ परगावी, तर लहान भाऊ रमेश हा शेळ्यांना चरण्यासाठी घेऊन गेला होता.

सविता घरी एकटीच होती. सायंकाळी सहा वाजता रमेश शेळ्यांना घेऊन घरी आला. घरी कोणीच नव्हते. सविता वडिलांसोबत बाजारात गेली असावी, असा अंदाज करुन रमेश घरी बसला. रात्री आठ वाजता त्याचे वडील बाजारातून आले. पण त्यांच्यासोबत सविता नव्हती. त्यामुळे रमेशने चौकशी केली. वडिलांनी सविता घरीच होती, माझ्यासोबत बाजारला आली नाही, असे सांगितले. त्यानंतर सविताचा शोध घेण्यात आला. पण तिचा कुठेच सुगावा लागला नाही.मंगळवारी पहाटेपासून सविताचे कुटूंब व नातेवाईक तिचा शोध घेत होते. एका ऊसाच्या बांधावर सविताची चप्पल व पाण्याची घागर सापडली. शेत जमिनीतील पावलांच्या ठशावरुन नातेवाईक पिकामध्ये गेले. त्यावेळी सविताचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उमदीचे सहाय्यक निरीक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बलात्कार करुन सविताचा खून झाल्याचा संशय आहे. उत्तरीय तपासणीतून या संशयाचे उत्तर मिळणार आहे.

याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून सोनवणे कुटूंबाचा बदला घेण्यासाठी सविताचा बळी गेल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरु आहे. त्याद्दष्टिने पोलिसांनी तपासाला दिला दिली आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाSangliसांगली