शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचा १२८ रुपये कोटीत होणार कायापालट... पहा कोणते होणार बदल, नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:11 IST

महापालिका स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी १२८ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या प्रस्तावात अतिथिगृह व प्रसुतिगृहाच्या जागेत व्यापारी संकुल, बहुमजली पार्किंग, मटण व मच्छी मार्केट, अद्ययावत भाजी मंडई, रस्ते, शामरावनगरातील पाणी निचरा करण्यासह विविध कामांचा समावेश आहे.

सांगली : महापालिका स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी १२८ कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या प्रस्तावात अतिथिगृह व प्रसुतिगृहाच्या जागेत व्यापारी संकुल, बहुमजली पार्किंग, मटण व मच्छी मार्केट, अद्ययावत भाजी मंडई, रस्ते, शामरावनगरातील पाणी निचरा करण्यासह विविध कामांचा समावेश आहे. हे प्रस्ताव सोमवारी राज्य शासनाच्या तज्ज्ञ समितीकडे सादर केले जाणार असल्याचे सभापती अजिंंक्य पाटील यांनी सांगितले.महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी जाहीर केला होता.

या निधीतून शहरातील विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. हे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्याचा विषय शुक्रवारच्या स्थायी समितीसमोर होता. त्याला मान्यता देण्यात आली. सांगलीतील अतिथिगृह व प्रसुतिगृहाची इमारत पाडून त्या ठिकाणी अद्ययावत प्रसुतिगृह व नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ४ कोटींची तरतूद केली आहे. मिरजेतील खंदकाच्या जागेत अद्ययावत भाजी मंडईसाठी १३ कोटी, मिरजेच्या तालुका क्रीडा संकुल येथील चार एकर जागेत बगीचा विकसित करण्यासाठी २ कोटी २५ लाख, पंढरपूर रस्त्यावर वारकरी भवन बांधण्यासाठी ७० लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे.

सांगली येथील भावे नाट्यगृहाच्या समोरील जागेत बहुमजली पार्किंग व्यवस्थेसाठी तीन कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. शामरावनगर येथील कोल्हापूर रोड ते कुंभार मळ्यापर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी दहा कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. जीजी मारूतीजवळ नाल्याचे सांडपाणी शेरीनाला योजनेच्या उपसा केंद्राकडे नेण्यासाठी २ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे.

सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणामध्ये कुस्ती आखाडा, कबड्डी, खो-खो मैदान विकसित करण्यासाठी पाच कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. हिराबाग वॉटर हाऊस येथील धोकादायक इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीसाठी २ कोटींचा प्रस्ताव आहे. महापालिका इमारतींच्या डागडुजीसाठी १ कोटी, लिंगायत समाज स्मशानभूमीची दुरूस्ती व संरक्षक भिंतीसाठी ५० लाख, सांगली अमरधाम स्मशानभूमीसाठी ५०, तर कुपवाड स्मशानभूमीसाठी ६० लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता मिळाली असून नगरोत्थान योजनेच्या तज्ज्ञ समितीसमोर हे प्रस्ताव सादर होणार आहेत. त्यानंतर प्रस्तावांचा प्रकल्प अहवाल तयार करून निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे सभापती पाटील यांनी सांगितले.कुपवाडला दीड कोटीचबैठकीत सांगलीतील गोकुळ नाट्यगृह व शिवाजी मंडईच्या विकासावर केवळ चर्चाच झाली. स्थायी समितीला मान्यता देण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये या दोन्ही जागी भाजी मंडई विकसित करण्याचा उल्लेख नाही. अ‍ॅड. स्वाती शिंदे यांनी भाजी मंडई उभारण्याचा प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी सभापतींकडे केली. तसेच अद्ययावत नाट्यगृह बांधण्यात येणार होते, मात्र नाट्यगृहाचा प्रस्ताव देखील सभेत आला नाही. तसेच कुपवाडला शहरातील केवळ दीड कोटीचे प्रस्ताव तयार केले आहेत.शंभर टक्के निधी द्यावा : अजिंक्य पाटीलमुख्यमंत्र्यांनी नगरोत्थान योजनेतून शंभर कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. मात्र यामध्ये सत्तर टक्के राज्य शासन, तर तीस टक्के महापालिकेचा हिस्सा आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून शंभर टक्के निधी द्यावा, अशी मागणी भाजपच्या कोअर कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे शासनाकडून शंभर टक्के निधी मिळेल व प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वास सभापती अजिंक्य पाटील यांनी व्यक्त केला.

विकास कामांचे प्रस्ताव...प्रत्येक नगरसेवकासाठी : ५० लाख -मिरज भाजी मंडई विकसित करणे : १३ कोटी -शामरावनगर पाणी निचरा करणे : १० कोटी -सांगलीतील आंबेडकर स्टेडियम विकसित करणे : ५ कोटी -कुपवाड भाजी मंडई विकसित करणे : १ कोटी -जोतिरामदादा आखाडा विकसित व कॉम्प्लेक्स बांधणे : २ कोटी -सांगलीतील मटण व मच्छी मार्केट विकास : ३ कोटी -मिरजेतील शिवाजी क्रीडांगण विकसित करणे : ४ कोटी

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाMONEYपैसा