शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

सांगली : लैंगिक शोषणप्रकरणी कुरळप आश्रमशाळेवर ग्रामस्थांचा हल्ला, पोलिसांचा पुन्हा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:21 IST

कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेत मुलींचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला शाळेचा संस्थापक अरविंद आबाजी पवार (वय ६०, रा. मांगले, ता. शिराळा) याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी कुरळप गाव बंद ठेवले होते. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आश्रमशाळेवर हल्ला करत कार्यालयाची तोडफोड केली. पवारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्याच्या प्रतिमेचे दहनही केले.

ठळक मुद्देलैंगिक शोषणप्रकरणी कुरळप आश्रमशाळेवर ग्रामस्थांचा हल्ला, पोलिसांचा पुन्हा छापा आठ मुलींवर आत्याचार : कुरळप बंद; शाळेतील ७० मुलींकडे पोलिसांची चौकशी

सांगली : कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेत मुलींचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला शाळेचा संस्थापक अरविंद आबाजी पवार (वय ६०, रा. मांगले, ता. शिराळा) याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी कुरळप गाव बंद ठेवले होते. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आश्रमशाळेवर हल्ला करत कार्यालयाची तोडफोड केली. पवारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्याच्या प्रतिमेचे दहनही केले.दरम्यान, अटकेतील संशयित पवारसह शाळेतील स्वयंपाक कर्मचारी मनीषा कांबळे हिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी पुन्हा छापा टाकून आश्रमशाळेची झडती घेतली. तिथे शिक्षण घेणाऱ्या ७० मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली.

कुरळप (ता. वाळवा) येथील वारणा-मोरणा शिक्षण संस्थेच्या मिनाई आश्रमशाळाकोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. पीडित मुलींशी संवाद साधला. कुरळप पोलीस ठाण्यास भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला.

 प्रकरणाची मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी. कुणाचीही गय करु नका; जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे आदेश नांगरे-पाटील यांनी कुरळप पोलिसांना दिले आहेत.

कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली.

कुरळपच्या वारणा-मोरणा शिक्षण संस्थेच्या मिनाई आश्रमशाळेत गेल्या अनेक वषार्पासून मुलींचे लैंगिक शोषण सुरु होते. काही मुलींनी धाडसाने कुरळप पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्या नावाने पत्र पाठवून आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार याच्याकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती कळविली.त्यानंतर पोलिसांनी आश्रमशाळेवर छापा टाकला. दोन तास आश्रमशाळेची झडती घेतली.

कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली.

संशयित पवारच्या निवासी खोलीत उत्तेजक औषधे व अश्लिल सीडी सापडल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. गावातील आश्रयशाळेतील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थ संतप्त बनले. त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवले.

कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी गावात व तसेच आश्रमशाळेजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक मुलींच्या पालकांनी आश्रमशाळेकडे धाव घेऊन स्वत:च्या मुलींची गळाभेट घेऊन चौकशी केली. कुरळप पोलिसांनी आश्रमशाळेवर पुन्हा छापा टाकून झडती घेतली.

ग्रामस्थांनी गुरुवारी कुरळप गाव बंद ठेवले होते. कुरळप पोलीस ठाण्यासमोर जमलेली गर्दी. 

आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत अडीचशे मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये ७० मुली आहेत. या सर्व मुलींकडे महिला पोलिसांच्या पथकाने चौकशी केली. संशयित पवार हा आश्रमशाळेत कधी येत असे? तो मुक्कामाला दररोज राहत होता का? स्वयंपाकी कर्मचारी मनिषा कांबळे हिचे वर्तन कसे होते? ती मुलींना पवारकडे कधी पाठवित असे? याबद्दल चौकशी केली. अटकेतील पवार हा शिवसेनेचा शिराळ्याचा माजी तालुकाप्रमुख आहे. त्याला व मनिषा कांबळे या दोघांना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात उभे करण्यात आले होते.आश्रमशाळेतील नऊ ते अकरा वयोगटातील आठ मुलीवर पवारने अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पिडित मुलींची रात्री उशिरा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये पाच मुलींवर अत्याचार, तर तीन मुलींचा विनयभंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित पवारविरुद्ध बलात्कार, विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSangliसांगलीPoliceपोलिस