शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Sangli: ग्रामीण साहित्यातील 'वसंत' सरला, ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 10:31 IST

Sangli News: सांगलीचे सुपुत्र व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे  (वय ७९ ) आज  सकाळी ८.३० वाजता निधन झाले.

सांगली - सांगलीचे सुपुत्र व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे  (वय ७९ ) आज  सकाळी ८.३० वाजता निधन झाले.

वसंत केशव पाटील यांचे मूळ गाव कुमठे (ता. तासगाव, जि. सांगली) आहे. रयत शिक्षण संस्थेतून शिक्षक म्हणून सेवा सुरू केली आणि हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. ग्रामीण मराठी व हिंदी साहित्यात त्यांनी मोठे योगदान दिले. मूळ हिंदी लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या 'दशव्दार ते सोपान ' या आत्मचरित्राच्या मराठी अनुवादासाठी वसंत केशव पाटील यांना १९९६ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्यांना राज्य सरकारकडून साहित्य निर्मितीचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 

यशवंतराव: विचार आणि वारसा, छप्पर, आधुनिक शिक्षा शिल्पी : कर्मवीर भाऊराव पाटील, कंदिलाचा उजेड, सहीमागाचा माणूस असे त्यांनी कादंबरी, कथा, अनुवाद व कविता यामध्ये विपुल लेखन केले. 'केशवसुतांच्या निवडक कविता' असे नवे पुस्तक त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर होते. वसंत केशव पाटील यांचे अंत्यसंस्कार अमरधाम, सांगली येथे बुधवारी दुपारी होणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीmarathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र