शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :  नियतीचा आघात, तरीही दुष्काळाशी दोन हात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:00 IST

नियतीच्या आघाताने अपंगत्वाशी संघर्ष करणाऱ्या बस्तवडे (ता. तासगाव) येथील तीसभर दिव्यांगांनी अपंगत्वावरही मात केली. पानी फौंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली. पंचेचाळीस दिवसांत मोठ्या जिद्दीने श्रमदान करून तब्बल आठ माती नालाबांध तयार केले. अपंगत्वावर मात करून धडधाकट माणसाला लाजवेल, असे काम केले.

ठळक मुद्देनियतीचा आघात, तरीही दुष्काळाशी दोन हात..!बस्तवडेत दिव्यांगांचा आदर्श : श्रमदानातून साकारले माती नालाबांध

दत्ता पाटील 

तासगाव : नियतीच्या आघाताने अपंगत्वाशी संघर्ष करणाऱ्या बस्तवडे (ता. तासगाव) येथील तीसभर दिव्यांगांनी अपंगत्वावरही मात केली. पानी फौंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली. पंचेचाळीस दिवसांत मोठ्या जिद्दीने श्रमदान करून तब्बल आठ माती नालाबांध तयार केले. अपंगत्वावर मात करून धडधाकट माणसाला लाजवेल, असे काम केले.अपंग माणूस धडधाकट माणसासारखे काम करू शकत नाही, हा समज तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील दिव्यांगांनी खोडून काढला आहे. काही महिन्यांपूर्वी गावातीलच कविता सिद्राम पाटील यांनी गावातील दिव्यांगांचा शोध घेत संघर्ष दिव्यांग संघटनेची स्थापना केली.

कोण पायाने अपंग, कोणाला पूर्णपणे अंधत्व, कोण कर्णबधिर, कोण गतिमंद, अशा एक ना अनेक दिव्यांगांना एकत्रित करत कविता पाटील यांनी संघटना स्थापन केली. दिव्यांग म्हणून किमान स्वत:चे हक्क मिळवता यावेत, एवढ्याच माफक अपेक्षेने या संघटनेची स्थापना झाली.प्रत्येक सभासदाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. नेमके याच काळात दीड महिन्यांपूर्वी गावात वॉटरकप स्पर्धेअंतर्गत पानी फौंडेशनचे काम सुरु झाले. या संघटनेतील प्रत्येक सदस्य अपंगत्वापेक्षाही घरच्या परस्थितीनेच जास्त पिचलेला.

दुष्काळाच्या झळा यांनाही सोसाव्या लागलेल्या. त्यामुळे या सर्व दिव्यांगांनी पहिल्याचदिवशी दुष्काळाशी दोन हात करण्याचा निर्धार केला. ८ एप्रिलला मध्यरात्री १२ वाजताच कामाचा श्रीगणेशा केला. त्यादिवसापासून एकही दिवस न चुकता, न थकता कामात सातत्य ठेवले. दीड महिन्यात तब्बल आठ माती नालाबांध तयार केले.आधार कोण देणार?तहसीलदार सुधाकर भोसले यांनी संघटनेतील बहुतांश दिव्यांगांना पेन्शन मंजूर करून दिली. त्यामुळे सहाशे रुपयांचा आधार कुटुंबाच्या खर्चासाठी झाला.

दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम करत मिरज येथील लेप्रसी हॉस्पिटलने गावातील दिव्यांग आणि त्यांच्या नातेवाईकांना शिलाई प्रशिक्षण देऊन रोजगाराची दिशा दिली. मात्र प्रशिक्षण घेतले तरी शिलाई मशीन खरेदीसाठी पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न या दिव्यांगांना पडला आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर, सामाजिक संघटनांकडून पुढाकार घेण्याची गरज आहे.जिद्दीला पाठबळाची अपेक्षा

बस्तवडेतील दिव्यांगांनी एकत्रित जिद्दीची कहाणी प्रत्यक्षात समाजासमोर आणली. नि:स्वार्थी वृत्तीने केलेले हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र या संघटनेतील बहुतांश सदस्यांच्या मनात वाहणारी वेदना निराळीच आहे. बहुतांश अपंगांना शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळू लागले आहे. मात्र त्याव्यतिरिक्त शासनाकडून कोणतीच मदत मिळालेली नाही. दिव्यांगांच्या जिद्दीला पाठबळाची अपेक्षा आहे. 

टॅग्स :SangliसांगलीDisability Development Board, Washimअपंग विकास महामंडळ वाशिम