शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी सांगली ते मुंबई वारी निघणार; सायकल रॅलीचेही नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 15:51 IST

सांगली : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हाभर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. जरांगे-पाटील ...

सांगली : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हाभर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. जरांगे-पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे पायी चालत ते मुंबईत पाेहोचणार आहेत. याच आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगलीतूनही आरक्षणाची वारी काढून मराठा बांधव मुंबईतील आंदोलनात सहभागी होतील, असा निर्णय घेण्यात आला. सांगलीत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली.जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार पाठपुरावा करूनही राज्य सरकारचे त्याकडे लक्ष जात नाही. यामुळे आता २६ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी ते २० जानेवारीपासून पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. ही पदयात्रा २६ जानेवारीला मुंबईत पोहोचणार आहे.यात सहभागी होण्यासाठी सांगलीतील बांधवही चालत जाणार आहेत. ते जरांगे-पाटील यांच्यासोबत पुण्यापासून मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पदयात्रेला आरक्षण वारी असे नाव देण्यात आले आहे. त्यात गावागावांतील मराठा बांधव सहभागी होणार आहेत. २२ जानेवारीला सांगलीतून या वारीला सुरुवात होणार आहे.आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. २० जानेवारीला सांगलीतून सकाळी ही रॅली मुंबईच्या दिशेने रवाना होईल. ज्या बांधवांना सायकल रॅलीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अशोक पाटील कोकळेकर, युवराज शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने आणि ज्यांना शक्य आहे, त्यांनी वारीमध्ये चालत सहभागी होऊन आरक्षणाच्या लढ्याचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले, ऋषिकेश पाटील, युवराज शिंदे, अशोक पाटील, शंभोराज काटकर यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.

गुरुवारी बैठकीचे आयोजनआंदोलनाची पुढील दिशा ठरवत जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने मराठा बांधव या लढ्यात सहभागी व्हावेत यासाठी गाव पातळीवर प्रबोधन करण्यात येणार आहे. ‘आरक्षण वारी’चे नियोजन करण्यासाठी गुरुवार, दि. १८ रोजी सांगलीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबई