सांगलीत तिघांना लोखंडी रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST2021-01-04T04:23:30+5:302021-01-04T04:23:30+5:30

सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकामागे असलेल्या मुजावर प्लॉट परिसरात किरकोळ कारणावरून एकाच कुटुंबातील तिघांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात ...

In Sangli, three people were beaten with iron rods | सांगलीत तिघांना लोखंडी रॉडने मारहाण

सांगलीत तिघांना लोखंडी रॉडने मारहाण

सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकामागे असलेल्या मुजावर प्लॉट परिसरात किरकोळ कारणावरून एकाच कुटुंबातील तिघांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी फिरोज सिकंदर शेख (४०, रा. मुजावर प्लॉट) यांनी २२ जणांविरोधात शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.

शेख यांच्या तक्रारीनुसार जावेद इलाही पखाली, फारूख इलाही पखाली, निहाल जावेद पखाली, नईम जावेद पखाली, फैजान जमीर पखाली, आसमा जमीर पखाली, उजमा जावेद पखाली अनोळखी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून शेख यांना मारहाण करण्यात आली. पत्नी, मुलासही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार शहर पोलिसांत संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In Sangli, three people were beaten with iron rods