भारतीय अपंग महिला क्रिकेट संघात सांगलीची स्वाती भस्मे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:20 IST2019-12-02T16:19:28+5:302019-12-02T16:20:44+5:30

देशातील पहिला अपंग महिला क्रिकेट संघ तयार झाला असून, यामध्ये शिराळा येथील स्वाती भस्मे हिची निवड झाली आहे. मार्च २०२० मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिल्यांदा हा संघ तीन सामने खेळणार आहे.

Sangli swathes India's disabled women's cricket team | भारतीय अपंग महिला क्रिकेट संघात सांगलीची स्वाती भस्मे

भारतीय अपंग महिला क्रिकेट संघात सांगलीची स्वाती भस्मे

ठळक मुद्देभारतीय अपंग महिला क्रिकेट संघात सांगलीची स्वाती भस्मेबांगलादेशविरुद्ध पहिल्यांदा हा संघ तीन सामने खेळणार

शिराळा : देशातील पहिला अपंग महिला क्रिकेट संघ तयार झाला असून, यामध्ये शिराळा येथील स्वाती भस्मे हिची निवड झाली आहे. मार्च २०२० मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिल्यांदा हा संघ तीन सामने खेळणार आहे.

या संघासाठी दिव्यांग कंट्रोल बोर्ड आॅफ इंडिया व बडोदा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा दिवसांचे प्रशिक्षण शिबिर बडोदा येथे पार पडले. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जितेंद्रसिंह व हारून रशीद यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. जितेंद्रसिंह यांनी यापूर्वी मूकबधिर खेळाडूंच्या संघास विश्वचषक व रशिया कप मिळवून दिला आहे.

बडोदा येथे पार पडलेल्या प्रशिक्षणामधून कल्पना सातपुते, पिंकी तोमर, मंगला अडसर, ऋतुजा कवटोळे, त्रिवेणी बर्वे, स्वाती भस्मे, कमल कोरे, शालिनी सोनार, जारीना मणेर तसेच तीन फूट उंचीच्या प्राजक्ता मानकर यांची अखिल भारतीय अपंग महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. यामध्ये शिराळा येथील स्वाती भस्मे हिचाही समावेश आहे. या निवडीबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.
 

Web Title: Sangli swathes India's disabled women's cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली