शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : उत्पादन शुल्कचे चौगुले निलंबित, क्रांतीवरील कारवाई : माहिती देऊनही प्रकरण अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 13:19 IST

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी प्रकल्पावर कारवाई करण्यास विलंब केल्याचे कारण दाखवून राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाचे तत्कालीन निरीक्षक एस. डी. चौगुले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. वास्तविक चौगुले यांनीच कारखान्यावर कारवाई करण्याचे सुचविले होते. पण वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाईच्या माध्यमातून बळी दिला.

ठळक मुद्दे उत्पादन शुल्कचे चौगुले निलंबित क्रांतीवरील कारवाई : माहिती देऊनही प्रकरण अंगलट

सांगली : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या आसवणी प्रकल्पावर कारवाई करण्यास विलंब केल्याचे कारण दाखवून राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाचे तत्कालीन निरीक्षक एस. डी. चौगुले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. वास्तविक चौगुले यांनीच कारखान्यावर कारवाई करण्याचे सुचविले होते. पण वरिष्ठांनी त्यांच्यावर कारवाईच्या माध्यमातून बळी दिला.चौगुले यांच्याकडे सांगली शहर विभागाचा कार्यभार होता. काही महिन्यापूर्वी विटा विभागाचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिला होता. क्रांती कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. तशा कारखान्याकडे नोंदी आहेत. मे महिन्यात चौगुले यांची पुण्याला बदली झाली.

२१ मे रोजी त्यांनी सांगलीचा कार्यभार सोडला. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना क्रांती कारखान्याने बेकायदा स्पिरीटचे उत्पादन केल्याची माहिती दिली. त्यानंतर ते पुण्याला निघून गेले. चार दिवसानंतर सांगलीच्या पथकाने कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात १८ लाख लिटर स्पिरीट जप्त केले होते. याप्रकरणी प्रकल्पाच्या व्यवस्थापकाला अटक केली होती.कुंडल कारखान्यावर झालेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. १८ लाखाचे स्पिरीचे उत्पादन होईपर्यंत अधिकाऱ्यांना याची खबर कशी लागली नाही, असा समज करुन वरिष्ठांनी कोणतीही चौकशी न करता चौगुले यांना दोषी धरुन तडकाफडकी निलंबित केले आहे.

वास्तविक चौगुले यांनीच कारखान्यातील बेकायदा स्पिरीट उत्पादनाची माहिती दिली होती. ही बाब सांगलीतील अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी सांगितली नाही. आपल्यावर कारवाई होऊ नये, यासाठी काही अधिकाऱ्यांनी चौगुले यांना बळीचा बकरा बनविला असल्याची चर्चा सुरु आहे.माहिती नाही : किर्ती शेडगेयासंदर्भात सांगलीच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्याशी संपर्क साधून चौगुले यांच्यावर झालेल्या कारवाईची माहिती विचारली. पण त्यांनी मला काहीच माहिती नाही, असे सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेCrimeगुन्हा