शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

Gudhi padwa 2018 सांगली : अशा तयार होतात साखरमाळा, यंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:59 PM

गुढी पाडवा आणि साखरेच्या माळांचे दृढ नाते आधुनिक युगातही त्यातील धाग्यांइतकेच मजबुत आहे. याच साखरमाळांच्या उत्पादकांना यंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे साखरेचे दर गतवर्षापेक्षा कमी झाल्यानेही माळांच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. 

ठळक मुद्देअशा तयार होतात साखरमाळायंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासासाखरेपेक्षा शुद्ध असतात साखरमाळा

सांगली : गुढी पाडवा आणि साखरेच्या माळांचे दृढ नाते आधुनिक युगातही त्यातील धाग्यांइतकेच मजबुत आहे. याच साखरमाळांच्या उत्पादकांना यंदा अधिकच्या मागणीमुळे दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे साखरेचे दर गतवर्षापेक्षा कमी झाल्यानेही माळांच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. साखरमाळांच्या गोडव्याशिवाय मराठी नववर्षाची गुढी उभारली जात नाही. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा आजही अबाधित आहे. सांगलीच्या खणभाग तिवारी गल्लीतील जाधव बंधुंची साखरमाळा उत्पादनाची जवळपास ९0 वर्षाहून अधिक काळाची परंपरा आहे. सांगलीत असे काही मोजकेच परंपरागत साखरमाळा उत्पादक आहेत.

महाशिवरात्री संपली की लगेच दोन दिवसांनी साखरमाळा उत्पादनास सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हे काम संपते. यंदा बाजारात साखरमाळांना मोठी मागणी आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. साखरमाळांचे सध्याचे दर किलोला ८0 ते १२0 रुपये किलो असा आहे. मोठ्या माळांचा दर १00 ते २00 रुपये इतका आहे. 

होलसेल बाजारात सध्या साखरमाळांचा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याची माहिती येथील उत्पादक सरस्वती जाधव यांनी दिली. एका घरात आता तीन ते चार साखरमाळा लागतात. एक गुढीला, एक देव्हाऱ्यात आणि एक कुलदैवताला किंवा ग्रामदैवताला दिली जाते. सांगलीच्या बाजारात गेली आठवडाभर साखरमाळा दाखल झाल्या आहेत. अशा तयार होतात साखरमाळासुरुवातीला साखर स्वच्छ केली जाते. त्यासाठी दुधाचाही वापर केला जातो. शुद्ध स्वरुपातील साखरेचा पाक तयार करून त्यात खायचा नैसर्गिक रंग वापरला जातो. हा पाक गरम करून तो साच्यांमध्ये एका पळीद्वारे पद्धतशीरपणे ओतला जातो.

साच्यांमध्ये दोऱ्या अगोदरच घातल्या जातात. त्यानंतर पाच ते सहा साचे एकत्रीत बांधले जातात. पाण्याचा वापर करून ते सुखवले जातात. साचे उघडून त्यातील दोऱ्यांच्या सहाय्याने साखरमाळा अलगद काढून त्या टांगल्या जातात. साखरेपेक्षा शुद्ध असतात साखरमाळासाखरेचे पुन्हा शुद्धिकरण करण्याची प्रक्रिया माळा तयार करताना होते. पुन्हा ते गरम केले जाते. त्यामुळे जेव्हा साखरेपेक्षाही शुद्ध स्वरुप या माळांना प्राप्त होत असते. बऱ्याचदा घरात शिल्लक राहिलेल्या माळांचा चहासाठीही उपयोग केला जातो. तासाला तीनशे माळासाखरमाळा अत्यंत गतीने तयार केल्या जातात. एका तासात जवळपास ३00 माळा तयार होतात. दिवसभरातील आठ तास साखरमाळांच्या उत्पादनाचे काम चालते. म्हणजेच दिवसभरात अडिच हजार माळा तयार होतात.

टॅग्स :Gudhi padwa 2018गुढीपाडवा 2018Sangliसांगली