शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Sangli: जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा श्रीराज भोसले विजेता

By घनशाम नवाथे | Updated: May 27, 2024 20:13 IST

Sangli News: नूतन बुध्दिबळ मंडळाच्या वतीने आयोजित भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती ऑल इंडिया रॅपिड खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या श्रीराज भोसले याने विजेतेपद मिळवले. तर कोल्हापूरचाच सोहम खासबारदार उपविजेता ठरला.

- घनशाम नवाथे सांगली - नूतन बुध्दिबळ मंडळाच्या वतीने आयोजित भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती ऑल इंडिया रॅपिड खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या श्रीराज भोसले याने विजेतेपद मिळवले. तर कोल्हापूरचाच सोहम खासबारदार उपविजेता ठरला.

स्पर्धेच्या आठव्या फेरीत कोल्हापूरचा अथर्व चव्हाण व कोल्हापूरचा श्रीराज भोसले यांच्यातील डावात ७ गुणासह आघाडीवर असलेल्या श्रीराजने कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला. अर्ध्या गुणासह श्रीराजने ७.५ गुण मिळवून रोख पारितोषिकासह चषक पटकाविला. अथर्वला पाचव्या स्थानावर जावे लागले.कोल्हापूरचा सोहम खासबारदार व सातारचा ओंकार कडव यांनीही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला. सोहमने ६.५ गुणासह रोख पारितोषिक व उपविजेतेपद पटकाविले. ओंकारला तिसरे स्थान मिळाले. कोल्हापूरच्या आदित्य सावळकरने व कोल्हापूरच्याच संतोष कांबळे याचा ३५ व्या चालीला पराभव करू चौथे स्थान पटकाविले. संतोषळा सोळावे स्थान मिळाले.

कोल्हापूरचा अभय भोसले व मिरजेचा मुदस्सर पटेल यांच्यातील डावात मुदस्सरने अभयचा ३२ व्या चालीला पराभव करून सातवे स्थान पटकाविले. अभयला पंधराव्या स्थानावर जावे लागले. सांगलीच्या आदित्य टिळक याने चितळे डेअरीचा संतोष रामचंद्रे याचा पराभव करून सहावे स्थान मिळवले. संतोषला अठराव्या स्थानावर जावे लागले. सातारच्या उमेश कुलकर्णीने मिलींद नांदळे याचा पराभव करून आठवे स्थान पटकाविले. मिलिंदला सतराव्या स्थानावर जावे लागले. आंध्रप्रदेशच्या मोहमद खाँजा लतिफने कोल्हापूरच्या सारंग पाटील याचा पराभव करून नववे स्थान मिळवले.

सातारच्या अनिकेत बापटने ठाणेच्या अथर्व कदमचा पराभव करून अकरावे स्थान पटकाविले. सांगलीच्या आदित्य चव्हाणने सांगलीच्या नंदकिशोर लिमयेचा पराभव करून दहावे स्थान पटकाविले. कोल्हापूरच्या प्रणव पाटीलने कोल्हापूरच्या अरीन कुलकर्णीचा पराभव करून बारावे स्थान पटकाविले. पारितोषिक वितरण माजी प्राध्यापक, ज्येष्ठ जलतरणपटू रामकृष्ण आराणके, दडगे दुग्धालयाचे सुरेश दडगे यांच्याहस्ते व चिंतामणी लिमये यांच्या उपस्थितीत झाले.

टॅग्स :Chessबुद्धीबळSangliसांगलीkolhapurकोल्हापूर