शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

Sangli: अट्टल घरफोड्यासह सराफास सांगलीत अटक, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

By घनशाम नवाथे | Published: March 28, 2024 10:18 PM

Sangli News: बंद घरे फोडणारा अट्टल चोरटा सुनील नामदेव रुपनर (वय ३२, रा. कुपवाड, ता. मिरज) आणि त्याच्याकडून दागिने घेणारा सराफ सुशील संजय आपटे (वय २४, रा. गारपीर चौक, सांगली) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले.

- घनशाम नवाथे सांगली - बंद घरे फोडणारा अट्टल चोरटा सुनील नामदेव रुपनर (वय ३२, रा. कुपवाड, ता. मिरज) आणि त्याच्याकडून दागिने घेणारा सराफ सुशील संजय आपटे (वय २४, रा. गारपीर चौक, सांगली) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. रूपनरकडून पाच घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. चोरीचा ७ लाख ५२ हजार १०० रुपयांचा चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी, चोरीचे सोने विक्री करण्यासाठी एक जण सांगली रेल्वे स्थानकाच्या नजीक असणाऱ्या हरिप्रिया अपार्टमेंटसमोर थांबला असल्याची माहिती गुन्हे अन्वेषणच्या पथकातील पोलिस कर्मचारी बिरोबा नरळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवार, दि. २६ रोजी परिसरात सापळा रचला. अपार्टमेंट समोर एक जण संशयास्पद थांबलेला पोलिसांना आढळून आला. पोलिसांना पाहताच त्याने पलायनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता हातोडी, तसेच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली.

दागिन्यांसंदर्भात विचारणा केली असता संशयिताने एसबीआय, अभयनगर, बालाजीनगर, होळकर चौक, विष्णुघाट आणि सहारा चौक या परिसरातील बंद घरे फोडल्याची कबुली दिली. चोरीतील सोने त्याने त्याच्या ओळखीचा सोनार सुशील आपटे यास विक्री केल्याचे सांगितले. पोलिस तपासात संशयित सुशील आपटे यास घरफोडी करणारा सुनील रुपनर हा गुन्हेगार असून तो चोरीतील सोने आणून देत असल्याचे माहीत असूनही तो दागिने खरेदी करत होता.

रूपनर हा अट्टल चोरटा असून त्याच्यावर संजयनगर, विश्रामबाग आणि सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून संजयनगर हद्दीतील चार, शहर हद्दीतील एक अशा पाच घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. ७ लाख ५० हजार रुपयांचे सोने, रोख दोन हजार असा ७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, कर्मचारी बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, संदीप नलवडे, उदयसिंह माळी, सागर लवटे, अमर नरळे, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.

वारंवार दागिने खरेदीमुळे अटकसराफ आपटे याचा रूपनर हा मित्र आहे. तो चोरीचे दागिने आणून विक्री करतो हे त्याला माहीत होते. वारंवार दागिने खरेदी करून आपटे नामानिराळाच होता; परंतु गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याला अखेर जेरबंद केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी