शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :  वनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:22 IST

साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.

ठळक मुद्देवनवासाची चाहूल लागताच रामाचा धावा : धनंजय मुंडेबोरगाव येथे कार्यक्रम; भाजपवर टीका

बोरगाव : राजकारणातील वनवासाची चाहूल लागताच भाजप अन् शिवसेनेकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो. देवाच्या नावाने राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा हा डाव अनेक वर्षांपासून खेळला जात आहे.

साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केली.बोरगाव (ता. वाळवा) येथे अशोकराव पाटील यांचा एकसष्टीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.मुंडे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सव्वाशे कोटी जनतेची फसवणूक केली आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून खेळवायचे चालले आहे.ते म्हणाले, अशोकराव पाटील यांचे कार्य कौतुकास्पद आहे. ज्यांनी स्वत: कर्ज काढून कुटुंबाला वाचविले, त्यांनी दुसऱ्याला कर्ज देणाऱ्या सहकारी संस्था उभारल्या. यालाच शून्यातून जग निर्माण करणे म्हणतात.आमदार जयंत पाटील म्हणाले, अशोकराव पाटील यांचे कार्य तरूणांना व सहकाराला प्रेरणादायी आहे. भाजप केवळ वल्गना करणारे सरकार ठरले आहे. पुढील निवडणुकीनंतर त्यांची सत्ता राहणार नाही, म्हणून राम मंदिराची पुडी सोडली जात आहे. आगामी निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना एकत्रित करून लढा देणार आहोत. खासदार राजू शेट्टी महिनाअखेरपर्यंत राष्ट्रवादीसोबत येतील.उदयसिंह पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. धैर्यशील पाटील यांनी आभार मानले. यावेळी दिलीपराव पाटील, माणिकराव पाटील, अरूण लाड, पी. आर. पाटील, विनायक पाटील, नेताजी पाटील, शहाजी पाटील, रूपाली सपाटे, संग्राम पाटील, देवराज पाटील, सचिन हुलवान, माणिक शा. पाटील, कार्तिक पाटील, देवराज देशमुख, उदयसिंह शिंदे, डॉ. शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, अविनाश पाटील, भगवान पाटील, बाळासाहेब पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.तुम्ही ऊस पिकवा, आम्ही तोडतो...मुंडे यांना जयंत पाटील म्हणाले की, कृष्णा काठाने अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राला दिले. त्यात बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, राजारामबापू, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा समावेश आहे. यावर मुंडे म्हणाले, गोदावरीचे आणि कृष्णेचे अतूट नाते आहे. तसेच साहेब तुमचे आणि आमचेही आहे. तुम्ही ऊस पिकवायचा आणि तो आम्ही तोडायचा, असे म्हणताच एकच हशा पिकला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSangliसांगली