परभणीतील दगडफेकीबद्दल सांगलीत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST2021-08-01T04:25:15+5:302021-08-01T04:25:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या गाडीवर परभणी जिल्ह्यातील सेलू येथे ...

Sangli protest against stone throwing in Parbhani | परभणीतील दगडफेकीबद्दल सांगलीत निषेध

परभणीतील दगडफेकीबद्दल सांगलीत निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या गाडीवर परभणी जिल्ह्यातील सेलू येथे काहींनी दगडफेक केली. यात एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. या हल्ल्याचा सांगलीतील कार्यकर्त्यांनी निषेध केला. हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आरोपींना तात्काळ अटक करावी, दीपक केदार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना देण्यात आले. त्यांच्यामार्फत हे निवेदन गृहमंत्र्यांना पाठविण्यात आले. या घटनेचा निषेध रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक भूपेंद्र कांबळे, रोहित कांबळे, संतोष कांबळे, डीपीआयचे जिल्हा अध्यक्ष अविनाश वाघमारे यांनी केला.

Web Title: Sangli protest against stone throwing in Parbhani