सांगलीत मटका घेणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:22+5:302020-12-05T05:07:22+5:30

सांगली : शहरातील बदाम चौक ते हिराबाग कॉर्नर रोडवर मटका घेणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. युनूस मेहबूब पाथरवट (वय ...

Sangli pot holder arrested | सांगलीत मटका घेणारा अटकेत

सांगलीत मटका घेणारा अटकेत

सांगली : शहरातील बदाम चौक ते हिराबाग कॉर्नर रोडवर मटका घेणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. युनूस मेहबूब पाथरवट (वय ३६, रा. पाथरवट गल्ली, सांगली) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून दोन हजारांचा मु्द्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथे दारूसाठा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगलीतील बदाम चौक ते हिराबाग कॉर्नर रोडवर मटका घेणाऱ्यावर छापा मारून कारवाई करण्यात आली.

दुसऱ्या पथकाने घोरपडी येथे कारवाई करत २२०० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला. गावात चोरटी विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छाया तानाजी मलगे या महिलेच्या घरात देशी दारूच्या २६ बाटल्या मिळाल्या.

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रविराज फडणीस, अभिजित सावंत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Sangli pot holder arrested