शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हत्या प्रकरण : मृतदेह बाहेर फेकून पुरावा नष्ट करणे या दोघांना भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 14:02 IST

पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या हत्ये प्रकरणी बहुचर्चित हॉटेल ‘रत्ना डिलक्स’चा मालक कुमार कुमसगे (वय 48 वर्ष) व व्यवस्थापक शब्बीर नदाफ या दोघांना (वय 45 वर्ष) अखेर शनिवारी रात्री अटक करण्यात आली.

सांगली : पोलीस शिपाई समाधान मांटे यांच्या हत्ये प्रकरणी बहुचर्चित हॉटेल ‘रत्ना डिलक्स’चा मालक कुमार कुमसगे (वय 48 वर्ष) व व्यवस्थापक शब्बीर नदाफ या दोघांना (वय 45 वर्ष) अखेर शनिवारी रात्री अटक करण्यात आली. मांटे यांचा मृतदेह हॉटेलबाहेर फेकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांची संख्या 6 झाली आहे. विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्ना डिलक्समध्ये दारू पिण्याच्या वादातून समाधाने मांटे यांच्यावर धारदार हत्याराने 18 वेळा वार करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हा सर्व प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्याआधारेच पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली आहे. 

याप्रकरणी मुख्य संशयित झाकीर जमादार, त्याचा मेहुणा वासिम शेख, साथीदार अन्सार पठाण व राजू नदाफ यांना अटक केली आहे. या सर्वांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मांटे यांची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी हॉटेलच्या व्यवस्थापकासह काही वेटरनी मांटे यांचा मृतदेह हॉटेलबाहेर फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हॉटेलचा मालक कुमार कुमसगे हा विश्रामबाग येथे सह्याद्रीनगरमध्ये राहतो. शनिवारी सकाळी 7 वाजता त्याला घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. व्यवस्थापक नदाफ व चार वेटरनाही ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती. मांटे यांचा खून झाल्यानंतर नदाफने कुमसगे याला याची माहिती दिली. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कुमसगेच्या सांगण्यावरुन नदाफने वेटरच्या मदतीने मांटे यांचा मृतदेह हॉटेलबाहेर फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा  प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कुमसगे व नदाफला अटक केली आहे. चार वेटरना सोडून देण्यात आले आहे.

टॅग्स :MurderखूनSangliसांगलीPoliceपोलिस