शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील सराईत गुन्हेगार सांगली पोलिसांच्या जाळ्यात, २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By शीतल पाटील | Updated: October 25, 2023 15:31 IST

सांगली : सांगलीत घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. त्यांच्याकडून शहरातील चार घरफोडीचे गुन्हे ...

सांगली : सांगलीत घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. त्यांच्याकडून शहरातील चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. कैलास चिंतामण मोरे (वय ४३ ) आणि जयप्रकाश राजाराम यादव ( ३५ दोघेही रा. सोनगीर, आंबेडकर नगर, धुळे ) अशी संशयितांची नावे आहेत. चोरट्याकडून पोलिसांनी ३३ तोळे सोन्याचे दागिने, ५९३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार, रोख रक्कम असा एकूण २३ लाख ७१ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.काही महिन्यांपासून जिल्ह्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्याकरिता पोलिसांनी गस्त वाढविली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकास घरफोडीतील दोघे मणेराजुरी (ता. तासगाव)च्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तासगाव–मणेराजुरी रस्त्यावर सापळा रचला. काही वेळाने एका विना नंबरप्लेटच्या कारमधून संशयित आले. पोलिसांना हालचाली संशयास्पद वाटल्याने तातडीने दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सोने - चांदीचे दागिने, घरफोडीकरता लागणारे साहित्य, रोख रक्कम असा ऐवज आढळला. चौकशीत दोघांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून विश्रामबाग, मिरज आणि संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेले चार गुन्हे उघडकीस आले आहेत.ही कारवाई पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, पोलीस अधिकारी पंकज पवार, सिकंदर वर्धन यांच्यासह पोलीस कर्मचारी बिरोबा नरळे, सागर लवटे, अमर नरळे, सागर टिंगरे, विक्रम खोत, अजय पाटील आदींसह अन्य सहभागी होते.

चोरटे सराईतएलसीबीने अटक केलेले दोन्ही संशयित सराईत गुन्हेगार आहेत. कैलास मोरे याच्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये तसेच गुजरातमध्ये एकूण ७० हून अधिक तर जयप्रकाश यादव याच्यावर २१ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :SangliसांगलीtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस