शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी व्हीसी सुनावणीस परवानगी, कामटेसह सहाजणांच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:31 IST

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांच्या न्यायालयीन सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) घेण्यास जिल्हा न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली. दरम्यान, कामटेसह सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. पुढील सुनावणी आता व्हीसीद्वारे घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देअनिकेत कोथळे खून प्रकरण : कामटेसह सहाजणांच्या कोठडीत वाढपुढील सुनावणी आता व्हीसीद्वारे घेतली जाणार आतापर्यंत ५४ जणांचे जबाब, काम अजूनही सुरुच

सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांच्या न्यायालयीन सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) घेण्यास जिल्हा न्यायालयाने सोमवारी मंजुरी दिली. दरम्यान, कामटेसह सर्व संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत १४ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. पुढील सुनावणी आता व्हीसीद्वारे घेतली जाणार आहे.सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता.

याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कोठडीची सोमवारी मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत कोठडीत वाढ केली.कामटेसह सहाजण कळंबा येथील कारागृहात आहेत. न्यायालयाच्या सुनावणीसाठी त्यांना कोल्हापुरातून सांगलीत आणले जाते. सांगलीचे पोलिस कोल्हापूर कारागृहातून त्या सर्वांना घेऊन येतात. त्याशिवाय न्यायालयाच्या आवारातही मोठा बंदोबस्त तैनात करावा लागतो.

सुरक्षेच्या कारणास्तव कामटेसह सहा जणांची कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घ्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली केली होती. त्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे.जबाब सुरूचअनिकेत कोथळे प्रकरणात सीआयडीने आतापर्यंत ५४ जणांचे जबाब नोंदविले आहेत. संशयितांचे कॉल डिटेल्स मिळाल्यानंतर तपासाला गती मिळाली आहे. अमोल भंडारेला घाटावर घेऊन बसलेल्या त्या दोघांचा शोध अजूनही सुरूच आहे. जबाबाचे काम अजूनही सुरुच असल्याचे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणSangliसांगलीPoliceपोलिस