स्टीमबाथ घेताना सांगली महापालिकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:26 IST2018-09-30T23:26:08+5:302018-09-30T23:26:12+5:30

स्टीमबाथ घेताना सांगली महापालिकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक संजय बुवागिरी गोसावी (वय ५५) यांचा रविवारी सायंकाळी आमराई क्लबमध्ये स्टीमबाथ घेत असताना मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला ही बाब अजून स्पष्ट झाली नाही.
संजय गोसावी हे मूळचे आसुर्ली (ता. बारामती, जि. पुणे) येथील आहेत. दोन वर्षांपासून महापालिकेकडे मुख्य लेखापरीक्षक म्हणून काम पहात होते. यापूर्वी २००८ ते २०११ पर्यंत त्यांनी याच पदावर काम केले होते. मनमिळावू स्वभावामुळे ते महापालिकेत लोकप्रिय अधिकारी होते. रविवारी सायंकाळी ते आमराई क्लबमध्ये स्टीमबाथसाठी गेले होते. स्टीमबाथ घेत असतानाच ते त्याच खोलीत कोसळले. या खोलीत कोणीच नसल्याने या घटनेची माहिती आमराई क्लबच्या कर्मचाºयांना बराच वेळानंतर समजली. गोसावी हे स्टीमबाथच्या खोलीत बराचवेळ बाहेर न आल्याने कर्मचाºयांनी धाव घेतली. तोपर्यंत गोसावी हे निपचित पडले होते.