सांगली महापालिका सभेत भाजपा-काँग्रेसमध्ये खडाखडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 04:48 IST2018-09-11T04:48:31+5:302018-09-11T04:48:34+5:30

सांगली, मिरज, कूपवाड महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला.

Sangli municipal meeting held in BJP-Congress | सांगली महापालिका सभेत भाजपा-काँग्रेसमध्ये खडाखडी

सांगली महापालिका सभेत भाजपा-काँग्रेसमध्ये खडाखडी

सांगली : सांगली, मिरज, कूपवाड महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही काँग्रेसच्या आक्रमणाला भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आरोप-प्रत्यारोपांची सलामी झडली असून, दोन्ही पक्षांतील नगरसेवकांत खडाखडी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. आरोग्य, डास, कचरा उठाव, पाण्यावरून काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर भाजपानेही त्यांना गेल्या पंधरा वर्षांतील कारभाराचा जाब विचारत, आक्रमण परतवून लावले.
महापालिकेतील भाजपाच्या इनिंगला सोमवारी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पहिलीच महासभा असल्याने नव्या सदस्यांनाही उत्सुकता होती. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही भाजपावर हल्लाबोल करण्याची संधी दवडली नाही.

Web Title: Sangli municipal meeting held in BJP-Congress