शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका निवडणूक :  माधवनगरमध्ये साडेआठ लाखाची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 13:25 IST

माधवनगर (ता. मिरज) येथे नाकाबंदीवेळी एका मोटारीतून साडेआठ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. मोटारीचे मालक सुरेश शांतीनाथ कोठावळे (वय ५५, रा. पेठभाग) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ही रोकड शहरात आणली जात होती का? याची चौकशी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसांगली महापालिका निवडणूक :  माधवनगरमध्ये साडेआठ लाखाची रोकड जप्तनाकाबंदीत कारवाई : वाळव्यातील एकजण ताब्यात

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथे नाकाबंदीवेळी एका मोटारीतून साडेआठ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. मोटारीचे मालक सुरेश शांतीनाथ कोठावळे (वय ५५, रा. पेठभाग) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ही रोकड शहरात आणली जात होती का? याची चौकशी करण्यात येत आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दररोज सायंकाळी पाच ते रात्री अकरा या वेळेत संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील प्रमुख मार्गावर पोलिसांनी चेकपोस्ट नाके सुरु केली आहेत. यासाठी तंबूही मारला आहे.

माधवनगर जकात नाक्यावरही तंबू ठोकण्यात आली आहे. याठिकाणी संजयनगरचे पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदिवे, एस. पी. इंगवले, एन. एस. सुतार, एम. एम. कांबळे, हसन मुलाणी यांचे पथकाने बुधवारी सायंकाळी नाकाबंदी लावली होती.सांगलीहून पावणेसहा वाजता मोटार (क्र. एमएच १० ए ५१५१) भरधाव वेगाने आली. पथकाने मोटार थांबविली. मोटारीचे चालक व मालक सुरेश कोठावळे यांच्याकडे मोटारीची कागदपत्रे व तसेच वाहन चालविण्याचा परवान्याची मागणी केली. कोठावळे यांनी सर्व कागदपत्रे दाखविली. या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मोटारीची झडती घेतली. डिक्कीमध्ये एक बॅग सापडली. या बॅगेत आठ लाख ५१ हजाराची रोकड होती. यामध्ये पाचशे व दोन हजाराच्या नोटा होत्या.

दोन शासकीय पंच बोलावून घटनास्थळीच पंचनामा करुन ही रोकड जप्त करण्यात आली. कोठावळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर आयकर विभागाला या कारवाईची माहिती देण्यात आली. गुरुवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने संजयनगर पोलीस ठाण्यात जाऊन ही रोकड ताब्यात घेतली.रोकड व्यापाऱ्याचीकोठावळे यांचे वाळव्यात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी ही रोकड मार्केट यार्डमधील एक व्यापाऱ्याकडून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. पण यासंदर्भात ठोस कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. कोठावळे यांनी ही रोकड कोठून व कशासाठी आणली होती? ते सांगलीत घेऊन का फिरत होते? याची पुढील चौकशी आयकरचे अधिकारी करणार आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीCrimeगुन्हाPoliceपोलिस