शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election Results 2026: सांगलीत भाजपला रोखण्याची विरोधकांची खेळी फसली, आघाडीची समझोता एक्स्प्रेस रुळावरून घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:08 IST

मैत्रीपूर्ण लढती, बंडखोरी आणि स्थानिक समीकरणे भाजपच्या पथ्यावर, सर्वपक्षीयातील गटबाजी ही आली समोर, बंडखोरांकडून अनेक ठिकाणी फटका

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ घडवली आहे. भाजपला बहुमतापासून रोखण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी झाला असला, तरी सत्तेपासून दूर ठेवण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे. भाजपने ३९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विरोधकांकडून निवडणुकीपूर्वी मोठ्या आत्मविश्वासाने मांडली जाणारी ‘समझोता एक्स्प्रेस’ निकालाच्या रुळावर टिकू शकली नाही.महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर भाजपला रोखण्यासाठी महायुती, महाआघाडीतील पक्षातून मोर्चेबांधणी केली गेली. या निवडणुकीत भाजपविरोधात सर्वपक्षीय एकत्रित लढ्याची चर्चा होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यातील समन्वय भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्ष निकालात मतांचे विभाजन, अंतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे ही आघाडी कमकुवत ठरली. भाजपने ३९ जागा जिंकत स्पष्ट आघाडी घेतली, तर काँग्रेसला १८, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला १६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.भाजप बहुमताच्या एक पाऊल मागे थांबला असला, तरी विरोधकांना अपेक्षित असलेली एकजूट मतदानात दिसून आली नाही. अनेक प्रभागांत मैत्रीपूर्ण लढती, बंडखोरी आणि स्थानिक समीकरणे भाजपच्या पथ्यावर पडली. भाजपने संघटनात्मक ताकद, आक्रमक प्रचार आणि स्थानिक नेत्यांची बांधणी याचा पुरेपूर फायदा घेतला. दुसरीकडे, विरोधकांचे उमेदवार ठरवताना झालेला विलंब, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वाबाबतची संभ्रमावस्था याचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले.महाआघाडी व राष्ट्रवादी( अजित पवार) यांना अपेक्षित निकाल लागला नसला तरी भाजपच्या नेतृत्वाला ही जनतेने धक्का दिला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप ५५ जागा जिंकेल असा दावा केला होता. तर भाजपचे स्थानिक नेतेमंडळींना किमान ४५ जागा तरी मिळतील, अशी आशा होती. पण जनतेने भाजपलाही बहुमतापासून दूर ठेवले आहे. गत निवडणुकीत भाजपने ४१ जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यातही दोन जागा कमी झाल्या. यंदा भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. पण गटतटाच्या राजकारणात अडकल्याने भाजपला काही जागांचे नुकसान झाल्याचे निकालावरून दिसून येते.अजित पवार गटाची राष्ट्रवादी १६ जागांसह निर्णायक भूमिकेत दिसत असली, तरी सत्तास्थापनेसाठी भाजपला पूर्णतः रोखण्याइतकी संख्या विरोधकांकडे नाही. काँग्रेसने १८ जागा जिंकून काही प्रमाणात ताकद दाखवली असली, तरी स्वतंत्रपणे नेतृत्व घेण्याइतका आकडा गाठता आला नाही. शरद पवार गटाची कामगिरी केवळ तीन जागांपुरती मर्यादित राहिल्याने विरोधी आघाडीतील संतुलन अधिकच ढासळले. या साऱ्या घडामोडीत शिंदेसेनेने दोन जागा जिंकत महापालिकेत चंचूप्रवेश केला.भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने छुपा समझोता केला होता. भाजपविरोधात एकास एक लढतीचे गणित आखले होते. महाआघाडी व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने एकमेकांविरोधात उमेदवारही दिलेले नव्हते. यामागे भाजपचा रथ रोखण्याचीच खेळी होती. पण ही खेळी यशस्वी होऊ शकली नाही. उलट या खेळीचा तोटा मात्र महाआघाडीला विशेषतः राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला बसल्याचे दिसते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election: Opposition's plan to stop BJP fails; alliance falters.

Web Summary : In Sangli, the BJP emerged as the largest party with 39 seats, despite opposition efforts. Internal divisions and strategic miscalculations hampered the opposition's 'alliance express,' preventing them from challenging BJP's dominance. Congress won 18, NCP (Ajit Pawar) 16, and NCP (Sharad Pawar) only 3 seats.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा