Sangli Election सांगली महानगरपालिका निवडणूक : महापौर शिकलगार यांच्या उमेदवारी अर्जाला आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:56 IST2018-07-12T16:27:55+5:302018-08-02T17:56:44+5:30
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी छाननी झाली. यात सायंकाळपर्यंत कोणाकोणाचे अर्ज रद्द होतात, याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे. महापौर हारुण शिकलगार यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून सायंकाळी त्यांच्या अर्जावर निर्णय होणार आहे.

Sangli Election सांगली महानगरपालिका निवडणूक : महापौर शिकलगार यांच्या उमेदवारी अर्जाला आक्षेप
सांगली : सांगलीमहानगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी छाननी झाली. यात सायंकाळपर्यंत कोणाकोणाचे अर्ज रद्द होतात, याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे. महापौर हारुण शिकलगार यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून सायंकाळी त्यांच्या अर्जावर निर्णय होणार आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी विक्रमी अर्ज अर्ज दाखल झाले. महापौर हारूण शिकलगार यांनीही आपला अर्ज बुधवारी दाखल केला. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्जाला गुरुवारी जोरदार आक्षेप घेण्यात आला.
काँग्रेसने महापौर शिकलगार यांचा अर्ज तांत्रिक कारणाने बाद झाला, तर त्यांच्या चिरंंजीवाचा डमी अर्ज भरुन ठेवला आहे. शिकलगार यांच्याऐवजी त्यांच्या घरात उमेदवारी देण्यावरुन बराच खल झाला होता.
महापौर हारुण शिकलगार यांना तीन अपत्ये असतानाही त्यांनी ही माहिती लपविल्याचा आरोप आसिफ बावा यांनी गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला आहे. यासंदर्भातील तक्रार त्यांनी आज दाखल केली. शिकलगार यांना तीन अपत्ये असतानाही त्यांनी ही माहिती लपवून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
शासकीय निर्णयानुसार तीन अपत्ये असणारी व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र असतानाही त्यांनी अपत्याबद्दल माहिती लपवून अर्ज दाखल केला आहे. तो रद्दबातल ठरवावा, अशी मागणी आसिफ बावा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात इतर उनेदवारांच्या अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतरच सुनावणी करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.
दरम्यान, महापौरांच्या अर्जावरील सुनावणी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती ठोंबरे यांनी पत्रकारांना दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकले असून याबाबत सहा वाजता निकाल दिला जाईल, अशी माहिती ठोंबरे यांनी पत्रकारांना दिली.