शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:58 IST

आयुक्तांचा दणका 

सांगली : महापालिकेतील ठाणेदारांना दणका दिल्यानंतर आता आयुक्त सत्यम गांधी यांनी कामचुकार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे. मंगळवारी प्रभारी उद्यान अधीक्षक डॉ. रवींद्र ताटे यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले.तर नगररचना विभागाकडील कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख यांना प्रत्येक दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. आयुक्तांच्या कारवाईने महापालिकेत खळबळ उडाली आहे.महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थान विभागाचा पदभार डाॅ. ताटे यांच्याकडे होता. त्याकाळात त्यांनी दैनंदिन स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केले नाही म्हणून त्यांची घनकचरा विभागातून उचलबांगडी करण्यात आली. सध्या त्यांच्याकडे मुख्य उद्यान अधीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.उद्यान विभागाकडील देखभालीच्या अनुषंगाने दैनंदिन फिरती करून उद्यान देखभाल दुरुस्ती व दैनंदिन कामकाजाबाबतचे फोटो ग्रुपवर शेअर करणे व झाडांचे मंथन करणेबाबत सूचना देऊनही डॉ. ताटे यांच्याकडून याबाबत कार्यवाही झालेली नाही. यावरून त्यांचे कामकाज असमाधानकारक असून त्यांच्या सोपवलेल्या पदाची जबाबदारी, कार्य कर्तव्य ते सक्षमपणे पार पाडत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला.त्यांची वर्तणूक गंभीर स्वरुपाची, नियमबाह्य व शिस्त भंगाची असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार ते कारवाईस पात्र असल्याने त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचे आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी दैनंदिन पाहणी करून अशा बांधकामावर दंडात्मक कारवाई करावी. ही बांधकामे नियमित करावीत. याबाबतचे दैनंदिन उद्दिष्ट देत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश नगररचना विभागाकडील शाखा अभियंत्यांना आयुक्तांनी दिला होता.शिस्तभंगाची कारवाईबाबत कारणे दाखवाआदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा अभियंत्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला. यात कनिष्ठ अभियंता पंकजा कोरे, अण्णासाहेब मगदूम, यासिन मंगळवारे, रवींद्र भिंगारदिवे, अभिजित मोरे व शाबाज शेख या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील कोरे वगळता अन्य अभियंता मानधन तत्वावर पालिकेच्या सेवेत आहेत. महापालिकेचे प्रभारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाईबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Corporation suspends garden superintendent, fines six engineers for negligence.

Web Summary : Sangli Municipal Corporation's Commissioner took action against negligent employees. The garden superintendent was suspended for three months, and six engineers were fined ₹2,000 each for dereliction of duty regarding unauthorized constructions and failing to meet daily targets.