शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, चाकूने छातीत वार, प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 05:20 IST

Sangli Crime News: गली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

सांगलीसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चाकू अडकल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना आज मंगळवार दि. २७ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कलानगर येथे घडली. हल्ल्यानंतर माळी यांच्या मित्रांनी टिंबर एरियातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील माळी हे कुटुंबीयांसह कलानगर येथे राहतात. आज सायंकाळी ते मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते.  यावेळी त्यांच्या घराजवळ दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर दबा धरून बसले होते. माळी हे दुचाकीवरून उतरताच हल्लेखोरांनी चाकूने पोटात उजव्या बाजूला वार केले. वार इतका वर्मी होता की चाकू अडकून बसला. माळी यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर संशयित हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. माळी यांच्या मित्रांनी तातडीने टिंबर एरियातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी अति दक्षता विभागात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

तीन महिन्यापूर्वी हल्ला सुनील माळी यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी अज्ञातांनी काठीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. ही घटना ताजी असतानाच त्यांच्यावर पुन्हा खुनी हल्ला झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले  आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Fire Chief Attacked, Stabbed; Condition Critical

Web Summary : Sangli fire chief Sunil Mali was critically injured in an attack near his home. Two assailants stabbed him, leaving a knife embedded. Previously attacked three months ago, the motive remains unclear as he is treated at a private hospital.
टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी