शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

नव्या वर्षामध्ये सांगलीकरांच्या दिमतीला ई-बससेवा, आयुक्तांनी मिरजेतील डेपोच्या कामाची केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:54 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात नागरिकांसाठी ई-बस सेवा जानेवारी-फेबु्रवारीमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे मिरज येथे सुरू असलेल्या ई-बस डेपोचे ...

सांगली : महापालिका क्षेत्रात नागरिकांसाठी ई-बस सेवा जानेवारी-फेबु्रवारीमध्ये सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे मिरज येथे सुरू असलेल्या ई-बस डेपोचे काम डिसेंबरपर्यंत दर्जेदार व गतीने पूर्ण करावे, अशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिल्या.केंद्र शासन पुरस्कृत पी. एम. ई-बस सेवा योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात ई-बसेस सुरू होणार आहेत. त्यासाठी मिरज येथे बस डेपोचे काम सुरू करण्यात आले आहे. या नियोजित बस डेपोवर सुरू असलेल्या स्थापत्य व विद्युतीकरण कामांची पाहणी आयुक्त सत्यम गांधी यांनी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच काम गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना दिल्या. शिवाय बस डेपोचे काम गतीमान होऊन नागरिकांना लवकरच या योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अमर चव्हाण, प्र. कार्यकारी अभियंता विनायक जाधव, उपअभियंता महेश मदने, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता आदी उपस्थित होते.५० बसेस मिळणारकेंद्र सरकारच्या पीएम-ई बस योजनेत १०० बसगाड्यांना तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात ५० ई बसेस चालवणार आहे. १२ मीटर लांबीच्या २०, तर ९ मीटर लांबीच्या ३० मिनी बसेस महापालिकेकडे दाखल होणार आहे. मिरजेत मध्यवर्ती स्थानकांत चार्जिंग स्टेशन असेल. या कामासाठी दहा कोटींचा निधी खर्च होणार आहे.

केंद्राकडून अनुदानकेंद्र सरकार ही वाहने चालवण्यासाठी प्रतिकिलोमीटर २४ व २२ रुपये अनुदान देणार आहे. या योजनेसाठी महापालिकेच्या स्तरावर परिवहन समिती नियंत्रण स्थापन केली जाणार आहे. बस चालवण्यासाठी देखभालीसह ठेकेदाराची नियुक्ती केली जाईल. अनुदान व प्रवासी तिकीट उत्पन्नासह अन्य जाहिरातीस अन्य स्थानिक उत्पन्नातून ही बस चालवण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli to Get E-Bus Service; Depot Work Inspected

Web Summary : Sangli is set to launch e-bus service by February. Commissioner Satyama Gandhi inspected the Miraj depot, urging timely, quality completion. The project, under PM-E Bus Seva Yojana, includes 50 e-buses and a charging station funded by central grants. This aims to improve public transport.