शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत ३० हजार मतदार वाढले, प्रारूप यादी प्रसिद्ध; हरकतीसाठी २७ पर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:36 IST

गावभागमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी मतदार कुठे...जाणून घ्या

सांगली : महापालिकेची निवडणूक सात वर्षांनी होत आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी महापालिकेची मतदार संख्या ४ लाख २४ हजार १७९ इतकी होती. त्यात आता ३० हजार २४९ मतदारांची वाढ होऊन ४ लाख ५४ हजार ४२८ झाली आहे. लोकवस्तीची वाढ आणि नवमतदारांची भर यामुळे मतदार संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आज, गुरुवारी महापालिकेने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.महापालिकेची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होत आहे. प्रत्येक प्रभागात २१ ते २७ हजार मतदार आहेत. महापालिका प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची मतदार यादी फोडून एक ते २० प्रभागांत विभागली आहे. ही मतदार यादी चार प्रभाग समिती, मुख्य निवडणूक कार्यालयासह संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२५ हजार दुबार मतदारमहापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत २५ हजार दुबार मतदार आहेत. त्यात सांगलीच्या प्रभाग समिती १ मध्ये ६ हजार ६९४, प्रभाग समिती २ मध्ये ६ हजार ७०१, कुपवाडमधील प्रभाग समिती ३ मध्ये ५ हजार ५२४ तर मिरजेच्या प्रभाग समिती ४ मध्ये ६ हजार २०० मतदारांची नावे दुबार आहेत. या दुबार मतदारांच्या नावासमोर निवडणूक आयोगाने स्टार केला आहे.

गावभागमध्ये सर्वाधिक तर सांगलीत सर्वात कमी मतदारमहापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार, गावभागचा प्रभाग क्रमांक १४ मध्ये सर्वाधिक २७ हजार ३५८ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार सांगलीवाडी प्रभागात १५ हजार ५१२ इतके आहेत. मिरजेत मीरासाहेब दर्गा परिसरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये सर्वाधिक २६ हजार ७८३ मतदार आहेत. त्या खालोखाल खणभाग, कुपवाड, सह्याद्री नगरमधील प्रभागांत मतदार संख्या अधिक आहे.

मतदार यादी कार्यक्रम

  • हरकती व सूचना : २७ नोव्हेंबर
  • अंतिम मतदार यादी : ५ डिसेंबर
  • मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी : ८ डिसेंबर
  • मतदान केंद्रनिहाय मतदार यादी : १२ डिसेंबर

प्रभागनिहाय मतदार संख्या प्रभाग मतदारसंघ१ - २६३८४२ - २१५६०३ - २१९२०४ - २४५३५५ - २२९३१६ - २६७८३७ - २२१९८८ - २२२१८९ - २५८८३१० - २३०४०११ - २१०२६१२ - २२३६८१३ - १५५१२१४ - २७३५८१५ - २१६९५१६ - २६५८८१७ - २२७२०१८ - १९७६७१९ - २२०५८२० - १७८८३

राज्य निवडणूक आयोगाने दुबार नावे मतदार यादीत शोधून त्यांच्यासमोर स्टार केले आहे. या दुबार मतदारांचा महापालिकेकडून शोध घेऊन त्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी केली जाईल. त्यांना एकदाच मतदान करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यांचे दुसऱ्या ठिकाणी असलेले नाव बाद करण्यात येईल. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. - स्मृती पाटील, उपायुक्त तथा नोडल अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Corporation sees 30,000 voter increase; draft list out.

Web Summary : Sangli Municipal Corporation's voter count rose by 30,000 to 4,54,428. The draft list is published, allowing objections until November 27th. It includes 25,000 duplicate voters marked with stars. Gavbhag has the most voters; Sangliwadi, the fewest.