Sangli Election Results : खासदार संजयकाका पाटील यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 14:05 IST2018-08-03T13:56:35+5:302018-08-03T14:05:01+5:30
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग पंधराचा धक्कादायक निकाल लागला.

Sangli Election Results : खासदार संजयकाका पाटील यांना धक्का
सांगली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग पंधराचा धक्कादायक निकाल लागला आहे. खासदार संजय पाटील यांचे मामेभाऊ रणजीत सावर्डेकर आणि दुसरे मामेभाऊ विक्रम सावर्डेकर यांच्या पत्नी सोनल हे दोघेही पराभूत झाले आहे. हे घराणे सांगलीतील प्रतिष्ठित असून भारतभीम जोतीरामदादा पाटील यांचे रणजित हे नातू तर सोनल नातसून आहेत.
प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनपाल खोत पराभूत झाले. काँग्रेसला रामराम करून स्वाभिमानी आघाडीत दाखल झालेले उपमहापौर विजय घाडगे विजयी झाले. माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांच्या पत्नी पद्मश्री, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, रईसा रंगरेज हे दोन्ही विजयी झाले.
मिरजेत ऐनवेळी भाजपमध्ये दाखल झालेल्या नगरसेवक सुरेश आवटी यांनी प्रभाग 3 मधील सर्व उमेदवार विजयी करीत आपण अजिंक्य असल्याचे सिध्द केले. त्यांचा मुलगा संदीप विजयी झाला. प्रभाग 6 माजी महापौर मैन्नुदीन बागवान, माजी महापौर इद्रीस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर नायकवडी, रजीया काझी, नर्गीस सय्यद यांनी विजय मिळवला.