शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

Sangli Election सांगलीत मनपा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 17:52 IST

मतदारांच्या स्वागताची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे

सांगली : महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( 1 ऑगस्ट) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी हे मतदान होत आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळत आहे. 

सांगलीत मतदारांच्या स्वागताची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अनेक मतदान केंद्रांवर रांगोळ्या काढून, नारळाच्या झावळ्या-आंब्याच्या डहाळ्या लावून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुलाबपुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी जिमखाना मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजता मतदान केले.

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर हे हिंदू-मुस्लिम चौकातील शाळा नंबर १७ येथील मतदान केंद्रावर स्वतः मतदारांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आवश्यक मतदान यंत्रांसह चोख व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. 

सांगली : महापालिका निवडणूकप्रभाग - २०जागा - ७८उमेदवार -  ५४१मतदान केंद्रे - ५४४मतदारांची संख्या - ४ लाख २४ हजार १७९पुरूष - २, १५,५४७महिला - २,०८,५९५इतर - ३७

Live Updates :

- सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणूक : दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी  ३४ टक्के मतदान झाले

- सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणूक : ११.३० पर्यंत सरासरी २१ टक्के मतदान.

- सांगली : आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांनी कुटुंबियांसह केले मतदान

- सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणूक : सकाळी 7-30 ते 9-30 या पहिल्या 2 तासात सरासरी 10 टक्के मतदान

- जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सपत्निक मतदान केले.

 

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकSangliसांगलीcongressकाँग्रेसBJPभाजपा