शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

सांगली महापालिका अंदाजपत्रक : बजेटच्या फुग्यात योजनांची हवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:08 AM

सांगली : प्रशासकीय बजेटच्या फुग्यात योजनांची आणखी हवा भरून स्थायी समितीने शनिवारी ६७६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका सभेत सादर केले.

ठळक मुद्देस्थायी सभापतींकडून महापौरांना सादर, ४७ कोटींच्या तरतुदी वाढविल्या

सांगली : प्रशासकीय बजेटच्या फुग्यात योजनांची आणखी हवा भरून स्थायी समितीने शनिवारी ६७६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका सभेत सादर केले. सभापती बसवेश्वर सातपुते यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश या अंदाजपत्रकात केला असला तरी, महसुली विभागांच्या कारभारावर बजेटचे आणि त्यातील योजनांचे भवितव्य अवलंबून आहे.महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा शनिवारी महापौर हारुण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत २0१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सातपुते यांनी सादर केले. काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनातर्फे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्थायी समितीकडे ६२९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. ४७ कोटी रुपयांच्या जादा तरतुदी करीत स्थायी समितीने अंदाजपत्रकात हवा भरली आहे. सभापती सातपुते यांनी सांगली, मिरजेत भाजीमंडई, ई-लायब्ररी यासह काही ठळक बाबींचा समावेश करून ६७६ कोटी ३१ लाखांचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले. या अंदाजपत्रकावर फारशी चर्चा न करता सर्व सदस्यांच्या सुचविलेल्या कामांचा समावेश या अंदाजपत्रकात करुन सर्वाधिकार महापौरांना देत अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने म्हणाले की, हे दिशाभूल करणारे फुगीर अंदाजपत्रक आहे. अन्य सदस्यांनी मागच्यावर्षी अंदाजपत्रकात तरतूद करुनही प्रशासनाने सहकार्य न केल्याने कामे झाली नाहीत. यावेळी असे न करता सर्व सदस्यांची बायनेम कामे धरुन मार्गी लावावीत.मंगळवारी बैठकगटनेते किशोर जामदार म्हणाले की, कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी अंदाजपत्रकात तरतूद करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या सदस्यांना वाटते की त्यांची काही कामे राहिली आहेत, त्यांनी आपले प्रस्ताव मंगळवारपर्यंत महापौरांकडे द्यावेत. त्याचदिवशी बैठक घेऊन या कामांचा समावेश अंतिम होणाऱ्या अंदाजपत्रकात करता येऊ शकेल.उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधा!स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे म्हणाले, नैसर्गिक नाल्याची रुंदी कमी होत आहे, याची पुन्हा मोजणी करुन नियोजन करावे. त्याचबरोबर महापालिकेच्या अनेक मालमत्ता तिन्ही शहरात पडून आहेत. त्याच्या उत्पन्नाचे नवे स्त्रोत म्हणून वापर करावा. यावेळी युवराज गायकवाड, संतोष पाटील, प्रियांका बंडगर यांनीही अनेक सूचना केल्या.आकडे ‘स्थायी’च्या अंदाजपत्रकाचे (रकमा कोटीत)आरंभीची शिल्लक १४५.६0महसुली जमा ३0१.८९भांडवली जमा १६३.३0एकूण जमा ५३0.0७शिलकेसह जमा ६७६.३१महसुली खर्च : २३९.0८भांडवली खर्च : ३७१.३३डेडहेडस खर्च : ६५.५१एकूण खर्च : ६७५.९३शिल्लक : ३८ लाख २0 हजार

टॅग्स :SangliसांगलीBudget 2018अर्थसंकल्प २०१८