शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका बजेटमध्ये शिळ्या कढीला ऊत-जनतेच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:20 IST

महापालिकेचा यंदाचा ७५० कोटीचा अर्थसंकल्प आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्थायी समितीकडे सादर केला. यात नव्या योजनांचा अभाव असून, शिळ्या कढीला ऊत आणला आहे. कागदपत्रांचे जतन, ई गव्हर्नन्स, कॉल सेंटर अशा काही योजनांची घोषणा झाली असली तरी, त्याचा

ठळक मुद्देनव्या योजनांचा अभाव : शंभर कोटींच्या निधीवर विकास कामांच्या स्वप्नांचे इमले

शीतल पाटील ।सांगली : महापालिकेचा यंदाचा ७५० कोटीचा अर्थसंकल्प आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी स्थायी समितीकडे सादर केला. यात नव्या योजनांचा अभाव असून, शिळ्या कढीला ऊत आणला आहे. कागदपत्रांचे जतन, ई गव्हर्नन्स, कॉल सेंटर अशा काही योजनांची घोषणा झाली असली तरी, त्याचा जनतेच्या सोयी-सुविधांशी संबंधच नाही. त्यात नगरोत्थान योजनेतून मंजूर शंभर कोटीच्या निधीवर विकासाचे इमले बांधण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत शंभर कोटीने अर्थसंकल्प वाढूनही जनतेच्या पदरी काहीच पडले नसल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

अर्थसंकल्पात दुर्मिळ, जुन्या कागदपत्रांचे स्कॅनिंग, जतन करण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांना इलेक्ट्रिकल व प्लंबरसह इतर सुविधांसाठी तीन शहरात कॉल सेंटर उभारण्यात येणार आहेत. शेरीनाला शुद्धीकरण, पंतप्रधान आवास योजना अशांसाठी पाठपुरावा करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. या काही गोष्टी वगळता इतर बाबी या जुन्याच आहेत.नाल्यावर : शुद्धीकरण यंत्रणामहापालिका क्षेत्रातील सहा नाले कृष्णा नदीला मिळतात. नाल्यांतील दूषित पाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याने कृष्णेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यासाठी शेरीनाला योजना राबविण्यात आली. पण ही योजनाही पूर्ण क्षमतेने सुरू नाही. त्यामुळे आता सहा नाल्यांवर सांडपाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी पाच कोटीची तरतूद करण्यात आली आहे.सांगली ड्रेनेजसाठी २२ कोटी आवश्यकसांगली शहरासाठी भुयारी गटार योजना २०११ मध्ये मंजूर झाली. २०१३ मध्ये या योजनेचे काम सुरू झाले. शासनाने ८२ कोटीची योजना १०४ कोटीवर नेली आहे. महापालिकेने स्वनिधीतून २५ कोटीचा खर्च केला आहे. तरीही अद्याप योजना पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण होण्यासाठी २१.८२ कोटीचा निधी लागणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे.मिरज ड्रेनेजसाठी २७.४६ कोटीची गरजसांगली ड्रेनेज योजनेप्रमाणेच मिरज शहरासाठी ५६ कोटीची भुयारी गटार योजना मंजूर झाली होती. दोन्ही योजनांचे काम एकाचवेळी सुरू झाले. ही योजनाही रखडली आहे. अजून काम पूर्ण होण्यासाठी २७.४६ कोटीची गरज आहे.शंभर कोटीवर भरवसामहापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटीचा निधी मंजूर केला आहे. महापालिका प्रशासनाने १४६ कोटीच्या कामांचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले आहेत. हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. यात रस्ते, नाट्यगृह, पार्किंग, भाजीमंडई अशी विविध कामे प्रस्तावित आहेत. या निधीवरच विकासाचे स्वप्न रंगविले जात आहे.

झोपडपट्टीधारकांना बैठ्या घरांचा प्रस्तावपंतप्रधान आवास योजनेतून शहरातील झोपडपट्टीधारकांना घरकुले देण्याचा संकल्प अर्थसंकल्पात केला आहे. घोषित झोपडपट्ट्यांतील नागरिकांना बैठी घरे दिली जाणार आहेत. त्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी दोन कोटीची तरतूद केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सांगलीतील इंदिरानगर झोपडपट्टीचा प्रस्तावही तयार केला जाणार आहे.

उत्पन्न २५९ कोटीमहापालिकेचे उत्पन्न व अर्थसंकल्प यात मोठा फरक आहे. प्रशासनाच्या अर्थसंकल्पानुसार यंदा २५९ कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. यात घरपट्टीतून ३५ कोटी, पाणीपट्टीतून २० कोटी, मालमत्ता ७ कोटी, एलबीटी अनुदानापोटी १६८ कोटीचे उत्पन्न मिळणार आहे, तर प्रशासन, आरोग्य, बांधकाम, शिक्षणसह विविध विभागावरील खर्च २५८ कोटीच्या घरात आहे.

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका