शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

चंद्रहार पाटील यांची मालमत्ता ४ कोटींहून अधिक, डोक्यावर 'इतक्या' लाखाचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 19:23 IST

४७ लाखांची मोटार; मारहाणीचा गुन्हा 

सांगली : सांगली लोकसभेच्या मैदानात महाविकास आघाडीकडून शड्डू मारण्यास सज्ज असलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी ३८ लाख रुपये इतकी आहे. तर चार लाख ५८ हजार रुपये कर्जाचा भार त्यांच्या डोक्यावर आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या चंद्रहार पाटील यांनी लोकसभेसाठी प्रथमच शड्डू ठोकत शिवसेनेत प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये जंगम मालमत्ता ६५ लाख ३१ हजार ६२३ रुपये इतकी दर्शवली आहे. तर स्थावर मालमत्ता ३ कोटी ७३ लाख ५९ हजार रुपये असल्याचे नमूद केले आहे. एकूण मालमत्ता ४ कोटी ३८ लाख ९० हजार रुपये आहे. तर ४ लाख ५८ हजार रुपये कर्ज दाखवले आहे.चंद्रहार पाटील ४७ लाखांच्या मोटारीतून फिरतात. त्यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाची कला शाखेची पदवी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन पूर्ण केले आहे.मारहाणीचा गुन्हा चंद्रहार यांच्याविरुद्ध शासकीय लोकसेवकास मारहाण केल्याबद्दल विटा पोलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल आहे. तसेच मारहाणीचा एक अदखलपात्र गुन्हाही नोंद आहे.मालमत्तेवर बोजागौणखनिज उत्खनन करून साठा केल्याबद्दल महसूल विभागाने २८ लाख ७५ हजार रुपयांचा बोजा त्यांच्या मालमत्तेवर नोंदवला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४chandrahar patilचंद्रहार पाटील