शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अब की बार, 'वेगळाच' उमेदवार! ४४ वर्षांनंतर सांगलीत 'वसंतदादा' घराण्यातील शिलेदाराविना निवडणूक

By संतोष कनमुसे | Updated: April 9, 2024 17:33 IST

सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून विशाल पाटील यांनीही उमेदवारीसाठी दावा सांगितला होता.

संतोष कनमुसे

सांगली लोकसभा मतदारसंघ म्हणजे एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. १९८० पासून वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवार या मतदारसंघात निवडून येत आहेत. पण, २०१४ च्या मोदी लाटेत सांगली लोकसभा मतदारसंघावर भाजपाने विजय मिळवला. २०१४ आणि २०१९ सलग दोन वेळा भाजपाच्या संजयकाका पाटील यांनी काँग्रेसचा पराभव केला. आता २०२४ च्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून उमेदवारही जाहीर झाले आहेत. महाविकास आघाडीत सांगली लोकसभेचा तिढा आज सुटला. तब्बल ४४ वर्षांनंतर वसंतदादा पाटील यांच्या घराण्याशिवाय सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक होणार आहे.  

२०२४ च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासूनच सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा सुरू झाला होता. सांगली लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला होता. पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. तर दुसरीकडे, काँग्रेसमधील आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असून हा आम्हीच लढवणार, असा पावित्रा घेतला होता. यावरून ठाकरे गट आणि सांगली काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. 

आमदार विश्वजीत कदम, विशाल पाटलांची दिल्लीवारी

सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा, या मागणीसाठी आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी दोन वेळा दिल्लीवारी केली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के.सी वेणुगोपाल यांची भेट घेतली होती. ही जागा काँग्रेसकडेच राहावी अशी मागणी त्यांनी केली होती. पण, तरीही काँग्रेसने ही जागा ठाकरे गटासाठी सोडली आहे. दरम्यान, आता विशाल पाटील बंडखोरी करणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

१९८० पासून सांगली लोकसभेवर वसंतदादा घराण्याचे वर्चस्व

१९८० नंतर सांगली लोकसभा मतदारसंघावर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्याचं वर्चस्व होतं. वसंतदादा पाटील चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याशिवाय, राजस्थानचे राज्यपाल, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीसपदही त्यांनी सांभाळलं होतं. यामुळे त्यांचं काँग्रेसमध्येही मोठं नाव होतं. वसंतदादा पाटील यांच्या काळात काही निवडणुकांची तिकिटं सांगली काँग्रेस भवनमधून ठरवली जात, असं जाणकार सांगतात. उमेदवारीसाठी राज्यातून नेत्यांची गर्दी होत असे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातून स्वत: वसंतदादा पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील, प्रतिक पाटील यांनी लोकसभेचं मैदान गाजवलं होतं. प्रतिक पाटील यांना केंद्रात मंत्रिपदाची संधीही मिळाली होती. 

२०१४ च्या मोदीलाटेत पराभव

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून संजयकाका पाटील यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत वसंतदादा पाटील यांचे नातू माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव झाला. यानंतर २०१९ च्या लोकसभेत विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीतही भाजपाच्या संजयकाका पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

दरम्यान, आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपाचे संजयकाका पाटील अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेऊन ४८ उमेदवारांची घोषणा केली. आता काँग्रेसचे विशाल पाटील बंडखोरी करणार, की पैलवान चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार, या चर्चा जोरदार सुरू आहेत.

विशाल पाटलांना २०१९ ला किती मत मिळाली?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली. ही निवडणूक तिरंगी झाली होती. वंचित बहुजन आघाडीकडून आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली होती, तर भाजपामधून खासदार संजयकाका पाटील मैदानात होते, या निवडणुकीत संजयकाका पाटलांना ५०८९९५ एवढी मत मिळाली होती. तर  विशाल पाटील यांनी ३ लाख ४४ हजार ६४३ एवढी मत मिळाली होती. 

सांगली लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघ

२८१ - मिरज विधानसभा मतदारसंघ (भाजपचे आमदार)२८२ - सांगली विधानसभा मतदारसंघ (भाजपाचे आमदार)२८५ - पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघ (काँग्रेसचे आमदार)२८६ - खानापूर विधानसभा मतदारसंघ (शिवसेनेचे आमदार)२८७ - तासगाव-कवठे महांकाळ  विधानसभा मतदारसंघ (राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार)२८८ - जत विधानसभा मतदारसंघ (काँग्रेसचे आमदार )

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४