शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'सांगलीची जागा सोडणं चूक, कारस्थान करणाऱ्यांचा वचपा काढणार'; विश्वजीत कदमांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:53 IST

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेसने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

Sangli Lok Sabha Election 2024 : सागंली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे आता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.  आज काँग्रेसनेसांगलीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभेच्या जागेवरुन भाष्य केले. जागावाटपावरुन चर्चा सुरू होत्या त्यावेळचा घटनाक्रमच विश्वजीत कदम यांनी यावेळी सांगितला. "आता सांगली लोकसभेत आपण काँग्रेस पक्ष देईल तो आदेश पाळू असंही कदम म्हणाले.  

कारस्थान करणाऱ्यांचा वचपा काढणार 

विश्वजीत कदम म्हणाले, २०१९ ला मला लोकसभा लढवण्यासाठी सांगितलं, मी त्यावेळी नाही म्हणून सांगितलं. मला त्यावेळी विधानसभा लढायचं आहे सांगितलं. गेल्या तीन महिन्यापासून आम्ही सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी ही मागणी केली, आमच्या एका तरुण सहकाऱ्याला आम्ही तयार केलं. त्यांना मी खासदार करणार असा विश्वास दिला. तुम्ही सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं. पण तीन महिने आम्ही तिकीट मागून काय झालं?   सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसचीच आहे असं बैठकीत सांगितलं.म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यात तयारी केली. नंतर आम्हाला  सांगितलं कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली त्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेला दिली. नंतर हातकणंगलेच्या जागेवर चर्चा सुरू झाली ती जागा शिवसेनेला दिली, राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत येणार अशा चर्चा सुरू झाल्या नंतर त्यांच्यात काय बिनसलं आम्हाला माहित नाही. 

"यानंतर सांगलीवर चर्चा सुरू झाली. सांगली मुळची काँग्रेसची जागा आहे म्हणून आम्ही सांगत होतो, चर्चा सुरू असतानाच अचानक उद्धव साहेब सांगलीत आले आणि उमेदवारी जाहीर केली. लोकशाहीत असं होतं का? आम्हाला विचारलही नाही. ही जागा देण चुकीच होतं या मतावर मी आजही ठाम आहे. ही जागा तुम्ही दिली नाही हे मला माहित आहे. आमचा तुमच्यावर आरोप नाही. पण, त्यावेळी कोण काय करत होतं यावर का लक्ष नव्हत हा माझा सवाल आहे, असा टोलाही विश्वजीत कदम यांनी लगावला. 

"सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आम्हाला वसंतदादा, पतंगराव कदम यांचा वारसा मिळाला. पण, आमच एक दुर्देव पण आहे. आम्ही एकत्र आलो याला दृष्ट लागली. पण मला एक सांगायचं आहे दृष्ट लागलेली काढता पण येते. ती दृष्ट काढण्याची जबाबदारी मी एकटा घेणार, असा इशाराही विश्वजीत कदम यांनी दिला. 

आमच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत

विश्वजीत कदम म्हणाले, काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले, पण काय झालं माहित नाही. आमच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर मला अनेकांनी प्रयत्न करण्याचा शब्द दिला. सगळीकडे मी माझ्या सहकाऱ्याला घेऊन गेलो. हे करत असताना काय झालं मला माहित नाही, अनेकांनी सांगितलं उमेदवारीच होत नाही. मागच्या दीड महिन्यात आम्ही उमेदवारीसाठी खूप कष्ट केलं. पण मी काँग्रेससाठी लढत होतो, राज्यात मी अनेक नेत्यांचा वाईटपणा घेतला. 

विशाल पाटलांना अपक्ष लढू नको म्हणून सांगितलं

मला काँग्रेस नेत्यांकडून मार्ग काढण्यासाठी फोन येत होते, ते माझ्याकडे १७, १८ तारखेला माझ्याकडे आले. त्यावेळी मी त्यांच्यामागे होतो. काँग्रेस, शिवसेनेचे नेते राहुल गांधींशी बोलून आम्ही राज्यसभेची कबुली घेतली. तेव्हा मी त्यांना अपक्ष लढू नको म्हणून सांगितलं यात फसू नका. राज्यसभा वाईट नाही म्हणून सांगितलं. पुढच्यावेळी आपण जागा सोडायची नाही असं त्यांना सांगितलं.

टॅग्स :sangli-pcसांगलीVishwajeet Kadamविश्वजीत कदमcongressकाँग्रेसvishal patilविशाल पाटीलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४