शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विटयात विशाल पाटील यांचे गुप्तगू, पाटील-बाबर गटाच्या कार्यकर्त्यांचे बंडखोरीला बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 18:11 IST

सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर ...

सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर व राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील हे युतीसोबत, तर समर्थक कार्यकर्ते बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासोबत असल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. दोन्ही गटांतील काही नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांची बंडखोर विशाल पाटील यांच्यासोबत तासगाव रस्त्यावरील माजी नगरसेवक महेशदाजी कदम यांच्या बंगल्यात मंगळवारी रात्री बैठक झाली. विटा येथील बाबर व पाटील या दोन्ही प्रमुख गटांचे नेते महायुतीसोबत आहेत. त्यामुळे सुहास बाबर व वैभव पाटील हे महायुतीचे उमेदवार व खासदार संजय पाटील यांच्या प्रचारसभांना उपस्थित राहत आहेत. परंतु, त्यांचे समर्थक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील हे मंगळवारी विटा परिसरातील गावांच्या दौऱ्यावर होते. या वेळी विशाल पाटील यांनी पाटील व बाबर गटातील प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर काही माजी नगरसेवक व विशाल पाटील यांची रात्री एकत्र बैठक झाली.

नेते नाही, पण कार्यकर्त्यांची बंडखोरी..विट्याचे माजी उपनगराध्यक्ष ॲड. सचिन जाधव, ॲड. धर्मेश पाटील, माजी नगरसेवक ॲड. विजय जाधव, महेशदाजी कदम, संजय तारळेकर, ॲड. भालचंद्र कांबळे, संजय कांबळे, राहुल कांबळे, गणेश गायकवाड, सुनील गायकवाड, रुद्राप्पा साबळे, अनिल निंबाळकर, राजू भोसले, सुधीर भंडारे, रामभाऊ दांडेकर, मंगेश चौगुले व गणेश चौगुले आदी पाटील व बाबर या दोन्ही गटांचे प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४vishal patilविशाल पाटील